रत्नागिरी : मडगाव - रत्नागिरी - मडगाव या पॅसेंजर रेल्वेगाडीचा शुभारंभ मडगाव स्थानकावर मंगळवारी सायंकाळी ७.१५ वाजता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रवासी गोवा येथे काम व व्यवसायानिमित्त जात असतात. त्यांच्यासाठी या नवीन गाडीचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही रेल्वे गाडी दररोज धावणार असून मडगाव येथून दररोज सायंकाळी ७ वाजून १० मिनीटांनी ती सुटेल आणि रत्नागिरी येथे मध्यरात्री १२ वाजून १५ मिनीटांनी पोहोचेल. तर रत्नागिरी येथून ही रेल्वे पहाटे ३ वाजून २० मिनीटांनी सुटेल आणि मडगाव येथे सकाळी ९ वाजून ५५ मिनीटांनी पोहोचेल. या रेल्वेला १८ डबे आहेत. यावेळी रेल्वेमंत्र्यांच्याहस्ते मडगाव स्थानकावर वायफाय सुविधा, सरकता जीना, खाद्यान्न स्टॉल्स आदी अत्याधुनिक सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. वायफाय सुविधेंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसोबतच स्थानिक प्रवाशांनाही इंटरनेटची सुविधा उपलब्ध होणार आहे. ही सुविधा पहिल्या ३० मिनीटांसाठी मोफत असेल.(प्रतिनिधी)
रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर रेल्वे सुरु
By admin | Published: March 31, 2015 9:25 PM