मालवण : गुहागर तालुक्यातील अनंत देवळे खून प्रकरणाच्या तपासासाठी रत्नागिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक रविवारी सायंकाळी मालवण येथे दाखल झाले. यात खून प्रकरणात संशयित आरोपींनी वापरलेले वाहन ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात आली. यात आणखी काहींचा सहभाग आहे का? याचीही माहिती घेतली, अशी माहिती ढवळे यांनी दिली.१३ आॅगस्ट रोजी गुहागर तालुक्यातील पिंपरी येथे राहणारे अनंत विश्राम देवळे यांचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी सागर दिनेश साळवी (२६, रा. मराठवाडी, ता. गुहागर) व योगेश मनोहर मेस्त्री-पांचाळ (३५, रा़ मेढा, मालवण शहर, सध्या रा. धुरीवाडा) दोघांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली.या खून प्रकरणातील संशयित सागर साळवी व योगेश मेस्त्री-पांचाळ यांनी गुन्ह्यात येथील पर्यटक व्यावसायिकाचे वाहन वापरल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यानुसार गुन्ह्यात वापरलेले वाहन ताब्यात घेण्यासाठी तसेच अधिक तपासासाठी रत्नागिरीतील पोलिसांचे पथक मालवण येथे दाखल झाले होते.
खुनाच्या तपास कामासाठी रत्नागिरी पोलीस मालवणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 4:11 PM
गुहागर तालुक्यातील अनंत देवळे खून प्रकरणाच्या तपासासाठी रत्नागिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक रविवारी सायंकाळी मालवण येथे दाखल झाले. यात खून प्रकरणात संशयित आरोपींनी वापरलेले वाहन ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात आली. यात आणखी काहींचा सहभाग आहे का? याचीही माहिती घेतली, अशी माहिती ढवळे यांनी दिली.
ठळक मुद्देखुनाच्या तपास कामासाठी रत्नागिरी पोलीस मालवणातरत्नागिरी पोलिसांनी दोघांना केली अटक