शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

रत्नागिरीत पावसाने दाणादाण

By admin | Published: August 03, 2016 1:00 AM

मंडणगडात उच्चांकी पाऊस : अनेक भागांत पाणी, दरडी कोसळण्याच्या घटना; घरे, गोठे यांची पडझड

 रत्नागिरी : सलग पाच दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. यामुळे अनेक गावांमध्ये घरे-गोठे यांच्या पडझडीबरोबरच पुराचे पाणी भरणे, दरडी कोसळणे, आदी घटना घडल्या असून, त्यात सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत मंंडणगड तालुक्यात २१५ मिलिमीटर (सुमारे ८ इंच) इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पाच दिवसांत पावसाने जिल्ह्यात जोरदार वृष्टी करण्यास सुरुवात केली आहे. संततधारेने कोसळणाऱ्या या पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. अनेक मार्गांवर दरडी कोसळल्या आहेत, तर अनेक घरे-गोठे यांचे नुकसान झाले आहे. विशेषत: मंडणगड, खेड या तालुक्यांत पाणी भरण्याबरोबरच दरडी कोसळण्याचे प्रकार घडले असून, संगमेश्वर, चिपळूण, राजापूर येथे पाणी भरले होते. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ मार्गावर दोन पुलांच्या मध्ये एस.टी. बस अडकली होती. त्यात २७ प्रवासी होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जवळजवळ १२ तासांहून अधिकवेळ हे प्रवासी बसमध्येच अडकून होते. याच तालुक्यात बहिरवली येथे दोन घरांचे अंशत: १८,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यात आंजर्ला येथे तीन घरांचे अंशत: ६३,५५० रुपयांचे, कर्दे येथे एका घराचे अंशत: तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. खेड तालुक्यातील घाणेखुंट येथे दोन घरांचे अंशत: १७,९७० रुपयांचे, तळे येथे एका गोठ्याचे अंशत: ३०,४०० रुपयांचे, साखर येथे शाळेचे अंशत: १६,४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तुळशी बुद्रुक येथे देवाचा डोंगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली आहे. डोंगर खचत असल्यामुळे सद्य:स्थितीत दरड बाजूला करता येणार नसल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मोरवंड येथे नादुरुस्त घर पडल्याने १,१४,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूण बाजारपेठ तसेच संगमेश्वर बाजारपेठ येथे १ आॅगस्ट रोजी सायंकाळी भरलेले पाणी आता ओसरले असून, परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मेढे येथे एका घराचे अंशत: २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कोळंबे येथे दरड कोसळली असून, तहसीलदार पाहणीसाठी गेले होते. याबाबतचा अहवाल तयार करण्याची कार्यवाही सुरूआहे. रत्नागिरी तालुक्यात शिवार-आंबेरे येथे अतिपावसामुळे तीन घरांचे व एका गोठ्याचे अंशत: नुकसान झाले असून, अहवाल तयार करणे सुरूआहे. राई-खापरेवाडी येथे एका घरावर झाड पडल्याने अंशत: २१,२०० रुपयांचे नुकसान झाले आहे. घरातील व्यक्तींना अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील आय.टी.आय.चे पत्रे वाऱ्यामुळे उडाल्याने अंशत: नुकसान झाले आहे. आंबेडकरवाडी येथे पोलिस ठाण्याजवळ रस्त्यालगतची भिंंत कोसळली आहे. पोमेंडी येथे सुरेश काळ्या पवार यांच्या घराभोवती पाणी भरले होते. हरचेरी येथे रस्त्यावर सोमवारी सायंकाळी भरलेले पाणी ओसरले असून, परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. राजापूर तालुक्यातील नाणार येथील विजयाकांत प्रभुदेसाई यांची म्हैस विद्युत तारेच्या स्पर्शाने जागीच मृत झाल्याने ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आली आहे. जिल्ह्यात सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत एकूण ११८८ मिलिमीटर, तर सरासरी १३२ मि.मी. पाऊस झाला आहे. राजापूर तालुक्यात सर्वांत कमी ४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. (प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्ग खचला...! खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीपासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या भोगाव-हेलंगेवाडी येथील २०० फुटांचा रस्ता खचला आहे. याच रस्त्यानजीकची दरडही कोसळली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. ही दरड बाजूला करण्यासाठी महामार्ग अधिकारी व कामगार दाखल झाले आहेत. दरड बाजूला करण्याचे काम अविरत सुरू आहे. कशेडीपासून दोन कि.मी. अंतरावर पोलादपूर हद्दीत ही घटना घडली आहे. रस्ता खचल्याने वाहतूक एकेरी सुरू आहे. मात्र, पाऊस सुरूच असल्याने या कामात अडथळा येत आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरूहोते. अडकलेल्या २७ प्रवाशांची सुटका मंडणगड तालुक्यात अडकून पडलेल्या ‘त्या’ २७ प्रवाशांची सायंकाळी उशिरा सुटका करण्यात आली. जवळपासच्या गावांत राहणारे ११ प्रवासी पायी रवाना झाले, तर बसच्या मागील बाजूस असलेल्या कॉजवेवरील पाणी ओसरल्यानंतर ही बस मागे घेऊन पुन्हा मंडणगडमध्ये नेण्यात आली आणि त्यानंतर दुसऱ्या मार्गाने त्यांना घरी पोहोचविण्यात आले. २४ तासांतील पाऊस (मि.मी) : मंडणगड २१५ दापोली १३८ खेड १६९ गुहागर ११३ चिपळूण १४० संगमेश्वर १२२ रत्नागिरी ११२ लांजा १३५ राजापूर ४४