सिंधुदुर्ग : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंदाजे ८५० किमीच्या ४६४ कोटीच्या रस्त्यांच्या कामांना विशेष बाब म्हणून सार्वाजनिक बांधकाम़मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी मंजुरी दिली. यासंदर्भातील बैठक मंत्रालयातील दालनात घेतली.
या बैठकीला रस्ते विभागाचे सचिव सी.पी. जोशी, रत्नागिरीचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सा. बां. विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांच्यासह चिपळूणचे सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तम मुळे, उत्तर रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता नरेंद्र सावर्डेकर, कणकवलीचे प्रदीप व्हटकर, सावंतवाडीचे युवराज देसाई उपस्थित होते.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुमारे १८५० कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्ती आणि नुतनीकरणाच्या कामांपैकी अंदाजे ८५० किमीच्या ४६४ कोटीच्या कामांना मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिली.दरम्यान, या निधीतून दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख मार्गांचे रस्ते दुरुस्ती; तसेच राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजूर पण अद्यापही हस्तांतरित न झालेल्या रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत राखण्यासाठीची आवश्यक कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री पाटील यांनी दिले.