सावंतवाडी : माजगाव सद्गुरू कृपा मित्र परिवार आयोजित खुल्या एकांकिका स्पर्धेत रत्नागिरी गणेशगुळे चतुरंग प्रॉडक्शनच्या रसिक एकांकिकेने प्रथक क्रमांक पटकाविला. मालवणच्या ही संगीत शिवपंचायतनची दुसरी बाजूने व्दितीय, तर देवगड श्री समर्थ कलाविष्कार गु्रपच्या संदूकने तृृतीय क्रमांक मिळविला.उत्तेजनार्थ म्हणून मुंबईच्या सत्कर्ष गु्रपच्या चुकीला माफी नाही आणि बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळच्या टेलीपथी या एकांकिकेची निवड करण्यात आली. विशेष पारितोषिकासाठी रत्नागिरी रसिक रंगभूमीच्या अर्थवर्म या एकांकिकेची निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून विश्वनाथ कामत, सचिन धोपेश्वरकर यांनी काम पाहिले.
उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे :दिग्दर्शक-विवेक गोखले (रसिक, चतुरंग प्रॉडक्शन, रत्नागिरी), राज बोडके (ही संगीत शिवपंचायतनची दुसरी बाजू, कलांकूर-मालवण), विजया कदम (संदूक, श्री समर्थ कलाविष्कार-देवगड),
अभिनय पुरूष-विवेक गोखले (रसिक), राजेंद्र बोडेकर (संदूक), स्वप्नील धनावडे (अर्थवर्म),
अभिनय स्त्री-पूजा सावंत (रसिक), शुभदा टिकम (ही संगीत शिवपंचायतनची दुसरी बाजू), निकिता सावंत (चंद्रभागा थिएटर्स, कणकवली),
बालकलाकार प्रथम-ऐश्वर्या शेळके (इचलकरंजी), रूद्र कदम (चुकीला माफी नाही),नेपथ्य-रूपेश नेवगी (ही संगीत शिवपंचायतनची दुसरी बाजू),प्रकाशयोजना-विश्वास रावणांग (रसिक, रत्नागिरी), किरण करवडकर (ही संगीत शिवपंचायतनची दुसरी बाजू), अभिजीत जाधव (चुकीला माफी नाही, मुंबई).
पार्श्वसंगीत-अक्षय जाधव (चुकीला माफी नाही, मुंबई), ऋत्विक धुरी (संदूक, देवगड), तेजस मसके (टेलीपथी, कुडाळ),रंगभूषा-ही संगीत शिवपंचायतनची दुसरी बाजू (मालवण), चुकीला माफी नाही (सत्कर्ष, मुंबई).
पारितोषिक वितरण विश्वनाथ कामत, सचिन धोपेश्वरकर, सद्गुरू कृपा मित्र परिवाराचे अध्यक्ष भास्कर कासार, संस्थापक संजय सावंत, उमेश सावंत, जगदीश सावंत, विजय सावंत, विठ्ठल सावंत यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी प्रथम तीन क्रमांक प्राप्त विजेत्यांना अनुक्रमे ८००१, ७००१, ६००१ रूपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ दोन्ही संघाना प्रत्येकी १ हजार रूपये व इतर विजेत्यांना रोख रकमेसह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.