शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

सतीश सावंत यांच्यावर केलेल्या टीकेला राऊळ यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 5:57 PM

Politics Sindhudurg- सतीश सावंत स्टंटबाजी करतात हे म्हणणे हास्यापद आहे, असा टोला शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी महेश सारंग यांना प्रसिद्धीपत्रकातून लगावला.

ठळक मुद्देसतीश सावंत यांच्यावर केलेल्या टीकेला राऊळ यांचा टोला सारंग यांना स्टंटबाजीचा अर्थ माहीत आहे का? : रुपेश राऊळ

सावंतवाडी : महेश सारंग यांना स्टंटबाजीचा अर्थ तरी माहीत आहे का?, माडखोलमध्ये सुरू होत असलेले प्रशिक्षण केंद्र हे सिंधुदुर्ग बँक, भगीरथ प्रतिष्ठान व देसाई डेअरी फार्म माडखोल यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. त्यात सतीश सावंत स्टंटबाजी करतात हे म्हणणे हास्यापद आहे, असा टोला शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी महेश सारंग यांना प्रसिद्धीपत्रकातून लगावला.

सारंग यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर केलेली टीका हास्यास्पद आहे. नीतेश राणे व त्यांच्या कुटुंबाला खूश करण्यासाठी सारंग करत असलेले खटाटोप म्हणजे खरी स्टंटबाजी आहे, असेही राऊळ यांनी सांगितले..महेश सारंग यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला राऊळ यांनी प्रसिद्धीपत्रकातून उत्तर दिले. राऊळ यांनी म्हटले आहे की, भगीरथ प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गेली दहा वर्षे जिल्हा बँक विविध उपक्रम राबवित आहे.

कदाचित हे महेश सारंग यांना माहीत नसेल. कारण सहकारी संस्थांचा व सारंग यांचा तसा दुरान्वयेही संबंध नाही. त्यांचा संबंध ठेकेदारी व्यवसायाशी आहे. सारंग हे कोलगाव दुग्ध उत्पादक संस्थेवर काम करतात. या संस्थेची आज अवस्था काय आहे, यासाठी एकदा वेळ काढून त्यांनी अवलोकन करावे तर त्याचा फायदा त्यांना व गावातील शेतकऱ्यांना होईल.महेश सारंग यांना माहितीचा अभाव आहे. त्यामुळे ते चुकीची माहिती देत आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे कणकवलीतील दूध डेअरी. ही डेअरी खूप जुनी आहे. त्यामुळे त्यांचे नेते दुग्ध विकासमंत्री होते हे खरे पण दूध डेअरी त्यांनी बांधलेली नाही. गेली कित्येक वर्षे कणकवलीतील डेअरी पूर्ण बंद अवस्थेत आहे व ती नीतेश राणे यांच्या मतदारसंघात असल्याने चालू करण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे एकदा जाहीर करावे.त्यामुळे सारंग यांनी सतीश सावंत काय करतात याचा विचार न करता आपण काय केले पाहिजे याचा विचार करावा व सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे तिकीट मिळण्यापूर्वी सहकाराचा अभ्यास करावा. आपल्या दूध संस्थेवर लक्ष केंद्रित करून तेथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही राऊळ यांनी म्हटले आहे....तर ४५०० शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतीलमहेश सारंग यांना खरीच शेतकऱ्यांबद्दल कळकळ असेल तर त्यांचे नेते नीतेश राणे यांनी गोकुळला बाजूला करून प्रतिभा दूध डेअरी जिल्ह्यात आणली. त्या डेअरीने शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यांच्याकडून २ कोटी ६६ लाख एवढी रक्कम शेतकऱ्यांना देणे असून ही जबाबदारी नीतेश राणे यांनी घेतली आहे. ती रक्कम देण्यासाठी सारंग यांनी प्रयत्न केले तर ४५०० शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील व त्याचा ठेकेदारी व्यवसायात त्यांना उपयोग होईल, असेही राऊळ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीSatish Sawantसतीश सावंतShiv Senaशिवसेना