देवगड : देवगड पंचायत समितीच्या सभापतिपदी लक्ष्मण राजाराम उर्फ रवी पाळेकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सुनील पारकर यांच्या राजीनाम्यानंतर सभापतीपद रिक्त होते. या पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पीठासन अधिकारी तथा तहसीलदार मारूती कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.पाळेकर यांची सभापतिपदी निवड झाल्यानंतर भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, माजी सभापती सुनील पारकर, उपसभापती डॉ. अमोल तेली, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, प्रकाश राणे, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, भाजप महिला तालुकाध्यक्षा संजना आळवे, जिल्हा परिषद सदस्य गणेश राणे, अनघा राणे, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळकृष्ण पाळेकर, पंचायत समितीचे सर्व सदस्य, भाजप पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारीवर्ग, ग्रामसेवक आदींनी पाळेकर यांची अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पाळेकर यांची पंचायत समितीच्या सभापतिपदी निवड जाहीर होताच पाळेकरवाडी येथील ग्रामस्थांनी जल्लोष केला.एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवडयावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब उपस्थित होते. सभापतिपदासाठी पंचायत समिती सदस्य तथा भाजप विजयदुर्ग मंडल अध्यक्ष रवी पाळेकर यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. एकमेव अर्ज दाखल झाल्याने पाळेकर यांची सभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
देवगड पंचायत समितीच्या सभापतिपदी रवी पाळेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 17:07 IST
panchayat samiti Devagad Sindhudurg- देवगड पंचायत समितीच्या सभापतिपदी लक्ष्मण राजाराम उर्फ रवी पाळेकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सुनील पारकर यांच्या राजीनाम्यानंतर सभापतीपद रिक्त होते. या पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पीठासन अधिकारी तथा तहसीलदार मारूती कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
देवगड पंचायत समितीच्या सभापतिपदी रवी पाळेकर
ठळक मुद्देदेवगड पंचायत समितीच्या सभापतिपदी रवी पाळेकर सुनील पारकर यांच्या राजीनाम्यानंतर पद होते रिक्त