कॅरम, गोल्फसह अन्य खेळांचा ‘शिवछत्रपती’ यादीत पुन्हा समावेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 25, 2024 04:34 PM2024-01-25T16:34:36+5:302024-01-25T16:35:24+5:30

क्रीडा कार्यकर्त्यांच्या लढ्याला मोठे यश

Re-inclusion of carrom, golf and other sports in Shiv Chhatrapati list, Deputy Chief Minister Ajit Pawar's instructions | कॅरम, गोल्फसह अन्य खेळांचा ‘शिवछत्रपती’ यादीत पुन्हा समावेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश 

कॅरम, गोल्फसह अन्य खेळांचा ‘शिवछत्रपती’ यादीत पुन्हा समावेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश 

सिंधुदुर्ग  : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस ॲण्ड स्नूकर, यॉटींग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडा प्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात यावे, तसेच जिम्नॅस्टिकमधील उपप्रकार असलेल्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत नव्याने सामावेश करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. यंदाच्या (सन २०२२-२०२३) पुरस्कारांसाठी फेरसमाविष्ट केलेल्या क्रीडा प्रकारातील अर्ज ऑनलाइन पद्धतीने तातडीने मागवून तेही विचारात घ्यावेत, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

राज्य शासनाने अलिकडे जारी केलेल्या सुधारित शासन निर्णयात, गोल्फ, पॉवर लिफ्टींग, बॉडी बिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अॅण्ड स्नूकर, यॉटींग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडा प्रकारांना वगळण्यात आले होते. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या खेळांच्या संघटनांनी त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याबाबत, तसेच त्यांच्या खेळांचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी पात्र क्रीडा प्रकारांमध्ये समावेश करण्याबाबत क्रीडा संचालनालयास पत्रव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, उद्योगमंत्री उदय सामंत, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे क्रीडा विभागाचे आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), अरुण केदार, अजित सावंत (कॅरम), संजय सरदेसाई, संजय माधव (पॉवर लिफ्टिंग), महेंद्र चेंबुरकर ( जिम्नॅस्टिक्स), देवेंद्र जोशी, क्षितिज वेदक (बिलीयर्ड्स आणि स्नूकर), विजय झगडे, राजेश सावंत (बॉडी बिल्डींग), विठ्ठल शिरगावकर (मॉडर्न नेन्थोलॉन) आदी उपस्थित होते.

Web Title: Re-inclusion of carrom, golf and other sports in Shiv Chhatrapati list, Deputy Chief Minister Ajit Pawar's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.