सिंधुदुर्गनगरी, दि. ५ : राज्यातील वाढती लोकसंख्या व वाढते नागरीकरण याअनुषंगाने महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ विचारात घेत कोकण विभागासाठी ७४४ तलाठी सजे व १२४ महसूल मंडळे निश्चित करुन दिली आहेत. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकूण १३ नवीन तलाठी सजे निश्चित करुन दिलेले आहेत.
राज्यात एकूण ३१६५ नवीन वाढीव तलाठी सजे व ६ तलाठी सजासाठी १ महसूली मंडळ या तत्वाप्रमाणे वाढीव तलाठी सजांसाठी ५२८ नवीन महसूली मंडळे स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
सजांची फोड किंवा पुनर्रचना करण्यासाठी नवीन सजांबाबतचे नकाशे आणि सीमा निश्चित करणे तसेच नवीन सजांचे मुख्यालय कोठे असावे, या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल सादर करण्याकरिता दि. २५ मे २0१७ रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक २ (२) मध्ये दिलेल्या निदेर्शानुसार उपविभागनिहाय उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.
त्यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपविभागीय निहाय होणाºया सजांची फोड किंवा पुनर्रचना करण्याबाबत सजांची निश्चिती केलेली आहे. उपविभागीय अधिकारी कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी यांच्याकडून तलाठी सजाच्या पुनर्रचनेबाबत अहवालही संबंधित कार्यालयास मिळालेला आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४, पोट-कलम (२) द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी तलाठी सजांची पुनर्रचना करण्याबाबतच्या अधिसूचनेचा प्रारुप मसुदा प्रसिध्द केला आहे.
तालुकावार तलाठी सजांची पुनर्रचना
सिंधुदुर्ग उपविभाग : कणकवलीतालुका देवगड : धोपटेवाडी - धोपटेवाडी, शेवरे, निमतवाडी. इळये- इळये, पाटथर.तालुका कणकवली : उत्तर दक्षिण गावठाण - उत्तर दक्षिण गावठाण, आनंदनगर, धारेश्वर, आवळेश्वर . नडगिवे - नडगिवे, वायगंणी. तरंदळे- तरंदळे.
उपविभाग कुडाळ - तालुका कुडाळदेवूळवाडी - देवूळवाडी, गोंधळपूर, वाडीवरवडे. आंबडपाल - आंबडपाल, मिटक्याची वाडी, मुळदे. तालुका मालवण - सुकळवाड- सुकळवाड, म्हावळुंगे.उपविभाग सावंतवाडी - तालुका सावंतवाडीसोनुर्ली - सोनुर्ली. क्षेत्रफळ- क्षेत्रफळ. तालुका वेंगुर्ला - पेंडूर - पेंडुर, सातवायंगणी. तालुका दोडामार्ग - केर -केर, मोर्ले, भेकुली, सोनावल - सोनावल, पाळये.