सावंतवाडी : सावंतवाडी टर्मिनसबाबत लोकमतने आवाज उठवताच कोकण रेल्वे जागी झाली असून, टर्मिनसचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा कोकण रेल्वेने केला आहे. तसेच या कामावर साडेसोळा कोटी रूपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सावंतवाडीला टर्मिनसचा दर्जा देण्यात आला की ते मिनी टर्मिनस आहे. हे मात्र कोकण रेल्वेने गुलदस्त्यातच ठेवले आहे. यांचे उत्तर मात्र दिले नाही. चार दिवसापूर्वी सावंतवाडीत आलेले केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे कान टोचल्यानंतर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.पंधरा दिवसापूर्वी लोकमतने कोकण रेल्वेच्या समस्या तसेच सावंतवाडी टर्मिनसची अवस्था यावर मालिका सुरू केली होती. या मालिकेची दखल खुद्द सावंतवाडीत आलेल्या केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी ही घेतली होती.त्यानंतर त्यांनी कोकण रेल्वेच्या अधिकाºयांशी संपर्क करत सावंतवाडी टर्मिनसची माहीती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कोकण रेल्वे च्या अधिकाºयांनी माहीती दिली असून यात सावंतवाडी टर्मिनसचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. यात टर्मिनसच्या ठिकाणी नवीन प्लॅटफॉर्म तसेच टर्मिनसला जोडण्यासाठीही नवीन अॅडीशनल प्लॅटफॉम आदी कामे पूर्ण झाली आहेत. असा दावा कोकण रेल्वे च्या अधिकाºयांनी केला आहे.
पादचारी पुलाचे काम पूर्णया कामावर साडेसोळा कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच नवीन प्लॅटफार्मकडे जाण्याचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. ते काम लवकरच पूर्ण होणार आहे. रेल्वे उभी करण्यासाठी दोन्ही प्लॅटफार्मला जोडणारा पादचारी पुल आदी कामे आता पर्यत कोकण रेल्वे महामंडळाने पूर्ण केली आहेत. तसेच उर्वरित कामे ही पूर्ण करण्यात येणार आहेत.त्यामुळे लवकरच टर्मिनसचे काम मार्गी लागेल तसेच येथे रेल्वे च्या अन्य गाड्या थांबणार आहेत.दरम्यान सावंतवाडी टर्मिनसचे काम लवकर पूर्ण होईल असा दावा कोकण रेल्वे करत असली तरी सावंतवाडीत टर्मिनस होणार कि मिनी टर्मिनस यांचा खुलासा अद्याप कोकण रेल्वेने केला नसून, टर्मिनस झाल्यास रेल्वेत पाणी भरण्याची सुविधा रेल्वे गाड्या धुण्यासाठी शेड आदीचे प्रयोजन अद्याप करण्यात आले नाही. मात्र सुरेश प्रभू यांनी कान टोचताच रेल्वे प्रशासनाकडून घाईगडबडीत माहीती देण्यात आली आहे. यात रेल्वेच्या दुपदरीकरणाबाबत ही माहीती देण्यात आली आहे.