सावंतवाडी : लॉकडाऊन काळामध्ये वीज वितरण कंपनीने भरमसाठ व अन्यायकारक वीज बिले काढली आहेत. या विरोधात सावंतवाडी शहर भाजपकडून येथील वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी अन्यायकारक वीज बिलांबाबत तोडगा निघाला पाहिजे. वीज ग्राहकांवर जबरदस्ती किंवा वीज तोडल्यास याद राखा, असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला. यावेळी भाजपने जोरदार घोषणाबाजी देत राज्य सरकारचा निषेध केला. वाढीव वीज बिलांविरोधात भाजपा पक्ष आक्रमक झालेला दिसून आला.सावंतवाडी येथील वीज वितरण कार्यालयावर शहर मंडल भाजपाच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकारी उपअभियंता एस. एस. भुरे यांना जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह उपस्थितांनी जाब विचारत निवेदन दिले.यावेळी नगराध्यक्ष संजू परब, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, राजू राऊळ, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, नासीर शेख, नगरसेविका दीपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, आंबोली मंडल अध्यक्ष संदीप गावडे, केतन आजगावकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर आदी सहभागी झाले होते.यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आघाडी सरकारचा निषेध केला. तसेच अन्यायकारकच वीज बिले माफ झालीच पाहिजेत, अशी मागणी केली. यावेळी अमित परब, बंटी पुरोहित संजू विर्नोडकर, दिलीप भालेकर, महिला शहर मंडल अध्यक्षा मोहिणी मडगाव कर, प्राजक्ता मुद्राळे, ज्योती पाटणकर, सुकन्या टोपले, परिणिती वर्तक, सुमित्रा साळकर, बेला पिंटो आदी उपस्थित होते.बिलांबाबत तोडगा काढा, अन्यथा गप्प बसणार नाहीतेली पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या वरिष्ठांकडून लोक अदालत घेण्याबाबत आणि त्यातून तोडगा काढण्याबाबत वक्तव्य केले होते. मात्र, अद्यापही त्यांना ही अदालत घ्यायला वेळ नाही. त्यामुळे वरिष्ठ शाखा कार्यालयाकडून आवश्यक दुरुस्त्या मागून घ्या व वीज बिलांबाबत तोडगा काढा.
अन्यथा भारतीय जनता पक्ष गप्प बसणार नाही. याठिकाणी लोकांच्या तक्रारी देण्यासाठी तक्रार निवारण कक्ष नाही. उत्तर देण्यासाठी जबाबदार व्यक्ती नाही. त्यामुळे येथील तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याबरोबरच योग्य जबाबदार व्यक्ती येणाऱ्या वीज ग्राहकांचे निराकरण करण्यासाठी बसवाव्यात, असे सांगण्यात आले.