रेडी बंदराचे काम ठेकेदारांकडून काढून घ्या; सत्यजीत तांबेंची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 06:13 PM2021-02-04T18:13:49+5:302021-02-04T18:13:56+5:30

बंदराचा कोणता विकास केल्याचा सवाल; सावंतवाडीत युवक काँग्रेसचा मेळावा

Remove ready port work from contractors; Demand for Satyajit Tambe | रेडी बंदराचे काम ठेकेदारांकडून काढून घ्या; सत्यजीत तांबेंची मागणी

रेडी बंदराचे काम ठेकेदारांकडून काढून घ्या; सत्यजीत तांबेंची मागणी

Next

सावंतवाडी :  सरकारने ज्या उद्देशाने रेडी बंदर ज्या ठेकेदाराकडे दिले होते, त्या उद्देशाने रेडी बंदराचा  विकास झाला नसून त्यामुळे अधिकचा भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे रेडीचे बंदर त्या ठेकेदाराकडून काढून घेण्यात यावे, अशी मागणी बंदर विकास मंत्र्यांकडे करणार असल्याचा इशारा प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिला आहे. तसेच पूर्वी आम्ही सावंतवाडीचा आदर्श घेत होतो, पण आता तो आदर्श दिसत नाही. त्यासाठी पुन्हा ते वैभव टिकावे यासाठी काँग्रेसने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तांबे हे गुरूवारी प्रथमच सिंधुदुर्गात आले होते. त्यांनी येथील रविंद्र मंगल कार्यालयात युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, विभावरी सुकी उपस्थीत होते.

तांबे म्हणाले, आपणास पुन्हा एकदा काँग्रेस उभी करायची आहे. त्यासाठी आजच्या युवकांतूनच उद्याचे नेतृत्व उभारी घेणार आहे. येथे अनेकांना पक्षाने ताकद दिली पण ते जाताना पक्षच सोबत घेउन गेले. त्यामुळे आपण थोडे कमी पडत असून, आता आपली राज्यात सत्ता आहे. त्यामुळे सर्व ताकद तुम्हाला देणार असून, काँग्रेसचा कोण अधिकारी ऐकत नसेल तर त्याला बांद्याहून चांद्याला पाठवण्याची जबाबदारी ही आमची आहे. त्यामुळे अधिकाºयांकडून कामे करून घ्या, पण ते सर्वसामान्य जनतेसाठी काम असावे, असे आवाहन तांबे यांंनी केले.

यावेळी त्यांनी रेडी बंदराच्या कामावर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. रेडी बंदराचे काम ज्या उद्देशाने सरकारने संबधित ठेकेदाराला दिले होते. तसे काम होताना आता दिसत नाही. आमचेच बंदर विकासमंत्री आहेत. त्याच्याकडे मागणी करणार असून, संबधित ठेकेदारांकडून काम काढून घेण्यात यावे आणि ते काम दुसºयाला दिले जावे रेडी बंदराच्या नावावर पैसे कमवण्याचा धंंदा सुरू झाला आहे. पण प्रत्यक्षात काम केले जात नाही, असा आरोपही तांबे यांनी केला आहे.

सिंधुदुर्गातील लढाई ही पैलवाना सोबतची आहे. याची आम्हाला माहीती आहे. त्यामुळे साम, दाम वापरून काँग्रेस बळकट केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत युवक व युवतींनाच प्राधान्य दिले जाईल. तसेच आम्ही महाविकास आघाडीत असलो तरी आता या पुढे सर्व निवडणूका लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सावंतवाडी व वेंगुर्ले नगरपालिका या राज्याला आदर्श होत्या, पण आता तो आदर्श राहिला नसल्याचेही तांबे यांंनी सांंगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, साईनाथ चव्हाण, विभावरी सुकी, सिध्देश परब, साक्षी वंजारी, दिलीप नार्वेकर यांंनी आपले विचार मांडले.

Web Title: Remove ready port work from contractors; Demand for Satyajit Tambe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.