गिरीश परबसिंधुदुर्गनगरी : ओरोस येथे आमदार वैभव नाईक यांनी आज, शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची भेट घेऊन जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा आढावा घेतला. जलजीवन मिशन योजनेतील एकही काम पूर्ण झालेले नसून कामांमध्ये असलेल्या त्रुटी आमदार नाईक यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. लवकरात लवकर ठेकेदारांकडून सर्व कामे पूर्ण करून घेऊन पाणी टंचाईची समस्या सोडविण्याच्या सूचना आ. नाईक यांनी दिल्या.त्याचबरोबर जलजीवन मिशनची कामे करताना रस्त्याची साईडपट्टी खोदण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. नागरिकांना याचा त्रास होत असून ठेकेदाराकडून ते सर्व रस्ते सुस्थितीत करून घेण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी दिल्या. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी जलजीवन मिशनच्या कामांच्या पूर्ततेसाठी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्याचे मान्य केले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, विभागप्रमुख शेखर गावडे, गंगाराम सडवेलकर, नागेश ओरोसकर, अणाव सरपंच लीलाधर अणावकर, आदी उपस्थित होते.
जलजीवन मिशन योजनेच्या कामातील त्रुटी दूर करा, आमदार वैभव नाईक यांनी घेतला कामांचा आढावा
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 31, 2024 6:45 PM