ठळक मुद्देप्रख्यात अक्षरकार कमल शेडगे यांचे निधनरायगडाला जेव्हा जाग येते नाटकासाठी पहिल्यांदा अक्षरलेखन
मालवण : प्रख्यात अक्षरकार कमल शेडगे (८५) यांचे शनिवारी राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कमल शेडगे यांना मुळात चित्रकलेची आवड होती. १९५५ साली टाईम्स आॅफ इंडियामध्ये नोकरी सुरू केल्यानंतर ते अक्षरलेखनाकडे वळले.महाराष्ट्र टाईम्स सुरू झाल्यानंतर त्यांनी मराठी अक्षरलेखन सुरू केले. १९६२ साली रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकासाठी त्यांनी पहिल्यांदा अक्षरलेखन केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.शेडगे यांच्या निधनाने अक्षराच्या दुनियेतील चमत्कार हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि सून असा परिवार आहे.