शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महापारेषणच्या खारेपाटण उपकेंद्रातील दुरूस्ती पूर्ण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 24, 2022 1:13 PM

आगीत उपकेंद्रातील कंट्रोल केबल जळाल्या

सिंधुदुर्ग : महापारेषणच्या २२०/१३२ केव्ही खारेपाटण अतिउच्चदाब उपकेंद्रातील दुरुस्ती कार्य सलग १५ तासाच्या अथक परिश्रमानंतर पुर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, मालवण, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील बाधित वीजपुरवठा अखेर पुर्ववत झाला. याकरिता कोल्हापूर, चिपळूण व रत्नागिरी येथून दाखल महापारेषणच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांसह महावितरण यंत्रणेने रात्रीचा दिवस केला. प्रसंगावधान राखून लोकप्रतिनिधी, नागरिक व वीजग्राहकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य दिले. दि.२२ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३५ वाजता खारेपाटण अतिउच्च दाब उपकेंद्राच्या आयसीटीत (इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मर) तांत्रिक बिघाड होऊन ऑईलने पेट घेतल्याने आग लागली. या आगीत उपकेंद्रातील कंट्रोल केबल जळाल्या. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कुंभारमाठ, पेंडूर ,आचरा, तळेबाजार, जामसंडे देवगड, वाडा, खारेपाटण व वैभववाडी या महावितरणच्या ३३/११ के व्ही उपकेंद्रावरील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला. जवळपास १ लक्ष २० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला.कणकवली व राजापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहाय्याने दीड - दोन तासाच्या कसरतीनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. त्यांनतर चाचपणी करून दुरूस्ती कार्य हाती घेण्यात आले. रात्रभर जागून, राबून काम पुर्ण केले. अखेर दि २३ सप्टेंबर  रोजी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी खारेपाटण उपकेंद्राचा वीजपुरवठा यशस्वीपणे पुर्ववत करण्यात आला.महावितरणचा महापारेषणच्या सहाय्याने वीजपुरवठ्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्याचा खटाटोप सुरू होता. सिंधुदुर्ग व ओरोस जिल्हा केंद्राचा वीजपुरवठा अडीच ते तीन तासात तातडीची पर्यायी व्यवस्था करून पुर्ववत करण्यात आला होता. त्यासाठी कणकवली अतिउच्च दाब उपकेंद्रातील  १६ एमव्हीए क्षमतेच्या एका पॉवर ट्रान्सफॉर्मरला ११० केव्ही राधानगरी अतिउच्च दाब उपकेंद्रावरून वीज पुरवठा जोडण्यात आला होता.महापारेषणचे संचालक (संचालन) अनिल कोलप हे सातत्याने क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. महावितरणचे मुख्य अभियंता विजय भटकर, अधिक्षक अभियंता विनोद पाटील, महापारेषणच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार, अधिक्षक अभियंता प्रांजल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, कार्यकारी अभियंता विनोद विपर, कार्यकारी अभियंता अभिजित ढमाले, कार्यकारी अभियंता विजय निकम आदींनी कामकाज पाहिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectricityवीज