बांदा : सह्याद्री पट्ट्यात कोसळणार्या मुसळधार पावसाचा फटका गोव्यातील पर्यटकांना बसला. दोडामार्ग तालुक्यातील घारपी येथे पर्यटनासाठी गेलेल्या २४ हून अधिक पर्यटकांचा ग्रुप धबधब्याखाली अडकले होते. बांदा पोलिसांनी सतर्कता दाखवित अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने सर्व पर्यटक सुखरूप बचावले.घारपी ते असनिये रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने म्हापसा गोवा येथून पर्यटनासाठी आलेले २४ लोक त्यांच्या गाडीसह अडकलेले होते. पर्यटकांची अडकल्याचा डायल ११२ पोलिस प्रणालीवर कॉल आला होता. बांदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे यांनी ताशत्काळ सूत्र हलवली व फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक समीर भोसले व पोलिस ठाण्यातील ८ अंमलदार यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी गेले. अन् सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. बांदा पोलिसांनी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.पर्यटक अडकल्याची माहिती रवी जाधव यांना सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. त्यांनी तत्काळ आपल्या टीम आणि साहित्यासह पोलिसांच्या आपत्कालीन टीमसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र तत्पूर्वीच बांदा पोलिसांनी सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले होते.
sindhudurg: घारपी धबधब्याखाली अडकलेल्या गोव्यातील पर्यटकांची सुटका, बांदा पोलिसांची सतर्कता
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 24, 2023 12:18 PM