सावंतवाडी - शहरातील गांजा पार्टी प्रकार ताजा असतानाच आता बांदा पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांच्या हद्दीतील सोनुर्ली येथे एका घरावर छापा टाकला. यात घराच्या मागच्या बाजूला असलेल्या मांगरात ब्राऊन शुगर गांज्याची आठ पाकिटे, नशेच्या गोळ््या, एक बंदूक, पाच जिवंत काडतुसे, गन पावडर आदी मुद्देमाल आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण उर्फ बबन बापू सावंत (४५, रा. पोटयेकुंभेवाडी, सोनुर्ली) याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास केली आहे.सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावापासून अंदाजे चार ते पाच किलोमीटरवर असलेली पोटयेकुंभेवाडी ही जंगलमय भागात आहे. या ठिकाणी रहदारी फारच कमी असते. या संधीचा फायदा घेत लक्ष्मण याने काही वर्षांपासून अमली पदार्थांचा व्यवसाय सुरू केला होता. तो गोव्यातून अमली पदार्थ घेऊन येत असे व जिल्ह्यात ठिकठिकाणी पुरवत होता. यातून त्याने लाखो रूपयांची उलाढाल केली होती. यावरूनच त्याच्यावर अनेकांनी संशयही व्यक्त केला होता. तसेच पोलिसांना निनावी पत्रेही पाठविली होती.मात्र, सावंतवाडी पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेतली नाही. त्यातच बांदा पोलिसांना चार दिवसांपूर्वी एक माहिती मिळाली होती. या माहितीत खबºयाने सातार्डामार्गे सावंतवाडीत ड्रग्स येणार, असे सांगितले होते. त्यावरून बांदा पोलिसांनी दोन दिवसांपासून सापळा रचून बबनवर लक्ष केंद्रित केले होते. यात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बबन हा गोव्यातून सातार्डामार्गे सोनुर्लीमध्ये आला आणि घरी गाढ झोपी गेला. त्याच वेळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बांदा पोलिसांच्या एका पथकाने साहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बबनच्या घरावर धाड टाकली. या अचानक पडलेल्या धाडीमुळे बबनच्या घरातील सर्व जण घाबरून गेले. मात्र पोलिसांनी बबनला पोलिसी हिसका दाखवताच त्याने अंमली पदार्थांचा साठा पोलिसांच्या स्वाधीन केला. हा सर्व साठा घराच्या मागे असलेल्या मांगरात एका हिरव्या कापडात गुंडाळून ठेवली होती.यात ब्राऊन शुगर गांजाची सात ते आठ पाकिटे, नशा येणाºया गोळ््या आदीसह एक बंदूक, पाच जिवंत काडतुसे, गन पावडर, १८३ छरे आढळून आले आहेत. पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच या प्रकरणी बबन बापू सावंत याला ताब्यात घेतले आहे. बांदा पोलिसांच्या मते हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याने अनेक वेळा अंमली पदार्थांची तस्करी केली असल्याचे पुढे येत आहे. पण तो हा साठा कोठून आणत होता आणि कोणाला देत होता याची माहिती मात्र अद्याप पोलिसांना मिळाली नाही.बांदा पोलिसांनी दुपारपर्यंत सर्व घटनेचा पंचनामा केला. तसेच सायंकाळी बबन सावंत यांच्यासह मुद्देमाल सावंतवाडी पोलिसांच्या स्वाधीन केला. सावंतवाडी पोलीस पुढील कारवाई करणार आहे. रात्री उशिरा आरोपी बबन सावंत यांच्यावर बांद्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या तक्रारीवरून अंमली पदार्थांसह हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस करीत आहेत.बबनच्या विरोधात अनेक अर्जबबन सावंत यांच्या विरोधात सावंतवाडी पोलिसांकडे अनेक निनावी अर्ज आले होते. पण त्यांची योग्य ती चौकशी झाली नसल्याचे आता पुढे येऊ लागले आहे. सोनुर्ली गावात लक्ष्मणच्या विरोधात मोठ्या प्रमाणात दबक्या आवाजात चर्चा होत की हा अवैध व्यवसाय करतो. पण त्याची पोलिसांनी दखल घेतलेली दिसत नसल्यानेच अखेर सावंतवाडी पोलिसांच्या हद्दीत येऊन बांदा पोलिसांना कारवाई करणे भाग पडले. निनावी अर्ज प्राप्त झाल्याचे सावंतवाडी पोलिसांनीही मान्य केले आहे.अमली पदार्थांचा झारापवरून पुरवठाबबन सावंत हा एखाद्या पायलटला गोव्याहून किंवा सोनुर्लीहून थेट झारापला घेऊन येत असे. तेथे पायलटला थांबवून काही पैसे देत होता. तू येथे जेवण घे, मी येतो, असे सांगून कोठे निघून जात होता याची माहिती मात्र कोणालाच मिळत नव्हती. असे वारंवार घडत होते. तसेच लक्ष्मण हा सतत पायलटही बदलत होता. तसेच कधी तरी तो अलिशान गाड्याही भाड्याला घेत असल्याचे पुढे आले आहे. त्याची पोलीस कसून चौकशी करणार आहेत.बबनचे सावंतवाडीतही डिस्ट्रीब्युटरलक्ष्मण सावंत हा अंमली पदार्थांचा व्यवसाय बरीच वर्षे करीत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. त्यांचे सावंतवाडीसह आजूबाजूच्या गावात मोठ्या प्रमाणात डिस्ट्रीब्युटर आहेत. पण तो मितभाषी असल्याने याची कुणकुण कोणालाच नव्हती. मात्र बांदा पोलिसांनी त्याची भांडाफोड करीत लक्ष्मणचे खरे रूप सर्वांसमोर आणले आहे. पोलिसांनी प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणे गरजेचेसावंतवाडीत गांजा पार्टी उधळून लावल्यानंतर आता सावंतवाडीपासून जवळच असलेल्या सोनुर्ली गावातच अंमली पदार्थांचा मोठा साठा पकडला गेल्याने याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच सावंतवाडीच्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांच्या म्हणण्यालाही आता दुजोरा मिळू लागला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन छडा लावणे गरजेचे आहे. सुतारकाम ते आलिशान राहणीमानलक्ष्मण सावंत याचे मूळ सावंतवाडी तालुक्यातच आहे. मात्र तो बरीच वर्षे आपल्या मामाच्या घराशेजारी सोनुर्ली येथे घर बांधून वास्तव्य करीत आहे. त्याच्या घरात बायको, आई, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. लक्ष्मण हा घर बांधल्यापासून अनेकांनी त्याला पाहिले होते. तो सुतारकाम तसेच मोलमजुरी करून स्वत:चा उदरनिर्वाह चालवत होता. पण गेल्या दहा वर्षात त्याच्या राहणीमानात बराच फरक पडला होता. सुतारकाम मोलमजुरी करणाºया लक्ष्मणच्या बागेत दहा ते बारा कामगार काम करीत असत. तसेच त्याने अनेक ठिकाणी बागाही घेतल्या होत्या. मात्र या मिळकतीचे स्त्रोत कोणालाच माहीत नव्हते. तो सर्वत्र बागा घेऊन विकसित करतो, असे सांगून उत्तर देण्याचे टाळत होता.
सावंतवाडीजवळील सोनुर्लीत सापडला आमली पदार्थांचा साठा, एक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 12:07 AM