कणकवली : कोरोनाच्या काळात संपूर्ण जग थांबलेले असताना शिक्षणाची ज्ञानगंगा चालू राहिली होती . ' शाळा बंद पण शिक्षण चालू ' या सदराखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी आपले ज्ञानदानाचे काम नियोजन बद्ध चालू ठेवले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी ऑनलाईन व्यावसायिक विकासमंच 'जिल्हा इन फोकस सिंधुदुर्ग ' यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्याला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या मुलाखतीला राज्यभरातील १००० शिक्षकांची उपस्थिती लाभली. या चर्चासत्रात डायट सिंधुदुर्गचे प्राचार्य डॉ . प्रकाश जाधव , प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर , केंद्रप्रमुख दिनकर तळवणेकर , पदविधर शिक्षिका स्नेहलता राणे , उपशिक्षक जकाप्पा पाटील यांनी कामकाजाचा आढावा घेतला. अधिकारी आणि शिक्षक यांच्यात उत्कृष्ठ समन्वय साधून कोरोनाच्या निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात कशी केली याबाबत त्यांनी सांगितले.मुलाखत सुबध्दतेत बांधण्याचे काम अधिव्याख्याता सुषमा कोंडुसकर यांनी केले .डॉ. प्रकाश जाधव म्हणाले, शिक्षकांच्या मागणीनुसार प्रशिक्षण देण्यात आले. त्यात तंत्रस्नेही , गणित , संबोध , सामाजिकशास्त्र , संशोधन व नवोपक्रम आदींचा समावेश होता. त्याचबरोबर शासनाच्या येणाऱ्या अभ्यासमाला प्रशासकिय यंत्रणेमार्फत नियमितपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम सुरू आहे . कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे.एकनाथ आंबोकर म्हणाले, कोविडच्या परिस्थितीने शिक्षकांच्या मानसिकतेवर पडलेला परिणाम हे खूप मोठे आव्हान होते. त्यातून कोविडची ड्यूटी करुन घेत असतानाच शिक्षणाचेही काम करुन घेणे यात कसोटी लागली . अनेक वेळा कठोर व्हावे लागेल . परंतू गटशिक्षणाधिकारी , केंद्रप्रमुख आणि शिक्षक यांनी जोमाने काम केले.त्यांनी शिक्षण जागृत ठेवले .पालकांना एकत्र आणण्याचे आव्हान होते !आमच्या शाळेतील ५०टक्के मुलांकडे आधुनिक भ्रमणध्वनी नव्हता. कोविडमुळे आपल्या मुलांच्या शिक्षणाचे काय ? या दबावाखाली असलेल्या पालकांना एकत्र कसे आणायचे हे मोठे आव्हान होते . शाळा समितीचे सहकार्य तसेच सहकारी शिक्षकांचे कामाचे नियोजन त्यामुळे विद्यार्थी व पालकयांच्याशी नेहमी संपर्कात राहणे सोपे गेले. असे 'पालकत्व जपणारी शाळा' या विषयावर बोलताना स्नेहलता राणे यांनी सांगितले.
'शाळा बंद पण शिक्षण चालू' चर्चासत्राला प्रतिसाद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 11:54 AM
कोरोनाच्या काळात संपूर्ण जग थांबलेले असताना शिक्षणाची ज्ञानगंगा चालू राहिली होती . ' शाळा बंद पण शिक्षण चालू ' या सदराखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी आपले ज्ञानदानाचे काम नियोजन बद्ध चालू ठेवले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी ऑनलाईन व्यावसायिक विकासमंच 'जिल्हा इन फोकस सिंधुदुर्ग ' यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्याला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ठळक मुद्दे'शाळा बंद पण शिक्षण चालू' चर्चासत्राला प्रतिसाद ! राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्रचे आयोजन