सिंधुदुर्गनगरी दि. २८ : राज्य सरकारने आॅटोरिक्षा-टॅक्सी परवाने जारी करण्यावरील निर्बंध उठविण्यात आलेले आहेत. राज्य परिवहन प्राधिकरण व प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी यापुर्वी घेतलेले निर्णय अधिक्रमीत केले असून नवीन तीन चाकी तीन आसनी आॅटोरिक्षा व टॅक्सी परवाने प्राप्त करण्याकरिता काही अटी व शतीर्ची पुर्तता करण्याबाबत सुचविण्यात आले आहे.
अपर परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कडील दिनांक २५ सप्टेंबर २0१७ रोजीच्या पत्रानुसार महाराष्ट्र शासनाने आपल्या अधिसुचना क्रमांक एमव्हीआर 0८१५/प्र.क्र.३८७/परि-२ दि. १७ जून २0१७ व अधिसुचना क्रमांक एमव्हीआर 0८१५/प्र.क्र.३८७/परि-२ दि. २२ सप्टेंबर २0१७ अन्वये शासन अधिसुचना एमव्हीए 0९९६ /सीएम-९/प्र.क्र.६६/परि-२ दि. २६ नाव्हेंबर १९९७ नुसार विंखडीत केली आहे.
राज्यात यापुढे तीन चाकी, तीन आसनी आॅटोरिक्षा व टॅक्सी परवाने याचे परवाने अटी व शर्तीच्या अधिन राहून जारी करण्यात येतील. अर्जदाराकडे परिवहन संवगार्तील आॅटोरिक्षा- टॅक्सी चालविण्याची वैध अनुज्ञप्ती व आॅटोरिक्षा किंवा टॅक्सी चालविण्याचा बॅज (कॅब बॅज) असणे आवश्यक आहे.अर्जदारास पोलीस विभागाकडून चारित्र पडताळणी दाखला सादर करणे आवश्यक राहील. अर्जदारास तो सरकारी- निमसरकारी, खाजगी कंपनी अथवा संघटीत क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत- उद्योगात नोकरी करीत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील. अर्जदाराकडे त्याच्या नावे आॅटोरिक्षा-टॅक्सीचा परवाना नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.परवान्यावरील दाखल करण्याची आॅटोरिक्षा मुबंई महानगर क्षेत्र व पुणे, पिंपरी - चिंचवड शहर येथे सीएनजी, एलपीली इंधनावर अथवा विद्युत उर्जेवर चालणारी असणे आवश्यक आहे. इतर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आॅटोरिक्षा पेट्रोल किंवा एलपीजी इंधनावर अथवा विद्युत उर्जेवर चालणारी असणे आवश्यक आहे.उर्वरित क्षेत्रात कोणत्याही इंधनावर चालणारी आॅटोरिक्षा नोंद करता येईल. मुंबई महानगर क्षेत्र व इतर महानगरपालिका क्षेत्रामध्ये नोंदणी होणारी आॅटोरिक्षा नविन असणे आवश्यक राहील. इतर क्षेत्रामध्ये परिवहनेवर संवर्गात नोंदणी झालेल्या जुन्या आॅटोरिक्षा स्विकारता येतील. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये नोंदणी होणाºया टॅक्सी केवळ पेट्रोल -सीएनजी इंधनावर अथवा विद्युत उर्जेवर चालणाºया असणे आवश्यक राहील.इतर क्षेत्रामध्ये टॅक्सीचे इंधनाबाबत संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या सध्या अस्तिवात असलेल्या धोरणनुसार स्विकारता येतील. भविष्यात शासनाने विहीत केल्यास परवानाधारकास आॅटोरिक्षा-टॅक्सीमध्ये जीपीएस -जीपीआरएस व आरएफआयडी टॅग बसविणे बंधनकारक राहील.अर्जदाराने बॅज प्राप्त करताना एसईसी नमुन्यातील अधिवास प्रमाणपत्र सादर केले असल्याने इरादापत्र-परवाना देताना पुन्हा अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. विद्युत उर्जेवर चालणा-या रिक्षांना दरदर्शिका (मिटर) असल्याशिवाय परवाने देण्यात येऊ नयेत. नवीन आॅटोरिक्षा टॅक्सी परवान्याकरिता मोटर वाहन नियम ७५ व ७५ (अ) नुसार विहीत केलेले शुल्क आकारण्यात येईल.तीन चाकी सहा आसनी आॅटोरिक्षा व जिप टाईप काळी- पिवळी टॅक्सी यांचे परवान्यावरील निर्बध पुर्वीप्रमाणेच चालु राहतील. आॅटोरिक्षा टॅक्सीच्या परवान्या संदर्भात राज्यातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेतील न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून परवाना देण्यात येतील. यापुर्वी झालेल्या आॅटोरिक्षा-टॅक्सी लॉटरीतील ज्या विजयी उमेदवाराचे अर्ज विचाराधीन असतील त्या व्यतिरिक्त उर्वरित प्रतिक्षायादी रद्द करण्यात येत आहे. अशा विचारधीन अजार्बाबत या आदेशातील अटी व शर्ती लागु राहतील.प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करता येईल. त्याचप्रमाणे खाजगी संवर्गात नोंदणी असणारी आॅटोरिक्षा नवीन परवान्यावर परिवहन संवर्गात नोंदणी करताना अथवा सध्याच्या परवान्यावर बदली वाहन म्हणुन परिवहन संवर्गात नोंदणी करताना शासनाने विहित केलेले अतिरिक्त परवाना शुल्क अदा करणे आवश्यक राहील. अशी खाजगी संवगार्तील नोंदणी झालेली आॅटोरिक्षा परिवहन संवर्गात नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ मार्च २0१८ पर्यंतच राहील. अर्जदाराने अर्ज www.parivahan.gov.in या संकेतस्थळावरुनच आॅनलाईन भरावयाचे आहेत, आॅनलाईन भरलेल्या अजार्ची प्रत या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन सिंधुदुर्गच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी केले आहे.