शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Sindhudurg: उद्योगासाठी कवडीमोल दराने घेतलेल्या जमिनी परत द्या, डॉ. जयेंद्र परूळेकर यांची मागणी 

By अनंत खं.जाधव | Published: May 02, 2024 12:37 PM

लवकरच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार 

सावंतवाडी : उद्योग धंद्याच्या नावाखाली मायनिंग करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कवडीमोल दराने घेण्यात आलेल्या जमिनी परत देण्यात याव्यात ज्या जमिनी घेण्यात आल्यात तो परिसर पूर्णपणे इकोसेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे याठिकाणी विनाशकारी प्रकल्प होणार नाहीत. त्यासाठीच शेतकऱ्यांना जमिनी परत दिल्या जाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून केली आहे. तसेच लवकरच या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार  असल्याचे परूळेकर यांनी म्हटले आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार  सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील बहुतांश गावे इकोसन्सेटिव्ह म्हणून जाहीर झाली आहेत. यातील  १६ गावात प्रस्तावित असलेले मायनिंग प्रकल्प होण्यासाठी जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. या सर्व जमिनी तेव्हा शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने घेण्यात आल्या आहेत. मात्र जमिनी खरेदी केल्यानंतर मागील पंधरा ते वीस वर्षात या जमिनीवर कोणताही प्रकल्प उभारण्यात आला नाही. त्यामुळे आता या जमिनी तशाच पडू नये या जमिनीवर कोणताही उद्योग येत नसेल तर आणि जमीन खरेदीनंतर उद्योग धंद्यासाठी असलेला कालावधी संपला असला तर या सर्व जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाव्यात अशी मागणी डॉ.परूळेकर यांच्याकडून करण्यात आली आहे.तसेच संबधित शेतकर्‍यांच्या जमिनी परत पुन्हा मिळाव्यात यासाठी वनशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात येणार आहे. अशी भूमिका डॉ. परुळेकर यांनी घेतली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग