थिएटर अकादमी पुणे आणि कणकवलीतील ‘अक्षरसिंधु कलामंच’च्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागीय संगीत नाट्यस्पर्धा कणकवलीत घेण्यात आली. या नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने संगीत नाटकाच्या पुनरूज्जीवनाच्या प्रयत्नात सिंधुदुर्गातील कलाकारांनी सहभाग नोंदवला. प्रयोगशील नाट्यकर्मी अतुल पेठे यांच्या ‘रिंंगण’ या नाट्यप्रकल्पात शिरगांव, देवगड येथील डॉ.राजेंद्र चव्हाण यांच्या नाटकाचा सहभाग होता. पुणे येथे नाटक सादर झाले. प्रा. मोहन कुंभार यांच्या ‘तगमग’ या काव्यसंग्रहाची प्रा.चंद्रकांत पाटील संपादित लोकवाङमय गृहप्रकाशनच्या ‘आरंभाची मालिका’ या प्रकाशन प्रकल्पात निवड झाली. आवानओल प्रतिष्ठानच्या कवी वसंत सावंत स्मृती उगवाई काव्य पुरस्कारासाठी औरंगाबाद येथील कवी अभय दानी यांच्या ‘असा हा जाळ’ या काव्यसंग्रहाची निवड झाली. कवी अजय कांडर यांच्या ‘हत्ती इलो’ या काव्यसंग्रहावर शिवाजी विद्यापीठाच्या युथ फेस्टिव्हलमध्ये वारणा कॉलेजकडून नाटक सादर झाले. या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला. आदिवासी जीवनावर निघालेल्या ‘म्हादू’ चित्रपटासाठी कवी अजय कांडर यांनी लिहिलेल्या आणि देवकी पंडीत यांनी गायलेल्या गाण्याला राज्य शासनाच्या पुरस्काराचे नॉमिनेशन मिळाले. सावंतवाडी येथे जानेवारीत होणाऱ्या सहाव्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी काळसे- मालवण येथील सतीश काळसेकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. सिंधुदुर्गातील इलेक्ट्रॉनिक मीडिया ग्रुपतर्फे राजकीय नेत्यांकडून काव्यवाचन करून घेण्याचा वेगळा प्रयोग कणकवलीत करण्यात आला होता. सिंधुदुर्गात चित्रपट शूटिंगसाठी चांगली लोकेशन्स असून हिंदी, मराठी चित्रपटांचे चित्रीकरण वाढते आहे. यावर्षी जिल्ह्यात ‘शाली’ या मराठी चित्रपटाचे शूटिंग झाले. देवगडात ‘लव्ह ट्रेनिंग’ या हिंदी चित्रपटाच्या गाण्याचे चित्रीकरण झाले. ‘भिकू’ हा मराठी चित्रपट स्थानिक कलाकारांकडून निर्माण केला जात आहे. ‘तर्पण’ राज्यनाट्य स्पर्धेतअक्षरसिंधु कलामंचाची निर्मिती असलेल्या आणि सुहास वरूणकर दिग्दर्शित ‘तर्पण’ हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सादर झाले. या नाटकाच्या निमित्ताने सिंधुदुर्गातील सांस्कृतिक चळवळीचा झेंडा राज्यपातळीवर फडकला. धनंजय सरदेशपांडे लिखित हे नाटक अक्षरसिंधुच्या स्थानिक कलाकारांनी कोल्हापूर येथील विभागीय स्पर्धेत सादर केले. मिलिंद पारकर
संगीत नाटकाचे पुनरूज्जीवन
By admin | Published: December 18, 2014 9:47 PM