कनेडी (सिंधुदुर्ग) : सध्या ऊन, पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कनेडी परिसरातील गावांमधील भातशेतीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही ठिकाणी शेतीला करपा रोगाने ग्रासले आहे. या नव्या संकटाने शेतकरी संकटात सापडला आहे.जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो एकर भातशेती पूर्णपणे कुजली आहे. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतील भातशेती अजूनही सुस्थितीत होती. मात्र, अतिवृष्टी आणि ऊन-पावसाच्या खेळामुळे शेतीला विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही भागातील भातशेतीवर निळे भुंगेरेंचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. येथील शेती सुरूवातीला लालसर होऊन नंतर करपल्यासारखी दिसत आहे. तर काही भागात करपा, शेंडा करपा, कडा करप्याचा प्रादुर्भाव दिसत आहे.सह्याद्रीच्या पट्ट्यातील नाटळ, दिगवळे, कुंभवडे, दारिस्ते, भिरवंडे, सांगवे, शिवडाव, हरकुळ, कुपवडे, जांभवडे, घोडगे या गावांमध्ये भातशेतीवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या कडक ऊन व पावसाचे कमी झालेले प्रमाण यामुळे अशा प्रकारचे रोग शेतीवर पडत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.कोकणातील शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. सुरूवातीला अतिपावसामुळे भातशेती कुजून व वाहून गेली. नंतर वन्यप्राण्यांनी काही ठिकाणची भातशेती फस्त केली आहे. याचा फटका सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांना बसला असून, जंगलापासून जवळच असलेली भातशेती वन्यप्राण्यांनी फस्त केली आहे.शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावागवा, सांबर, डुक्कर, माकडे यामुळे दरवर्षी येथील शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यातच आता पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मानसिकता नकारार्थी होण्याची भीती बुजूर्ग शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. शासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
भातशेतीला करपाचा विळखा, नव्या संकटाने शेतकरी हवालदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 2:50 PM
सध्या ऊन, पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कनेडी परिसरातील गावांमधील भातशेतीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही ठिकाणी शेतीला करपा रोगाने ग्रासले आहे. या नव्या संकटाने शेतकरी संकटात सापडला आहे.
ठळक मुद्देभातशेतीला करपाचा विळखा, नव्या संकटाने शेतकरी हवालदीलऊन पावसाच्या खेळाने विविध रोगांचा प्रादुर्भाव