देवगड : तालुक्यातील देवगड जामसंडे गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या दहिबाव अन्नपूर्णा नदीतील गाळ देवगड तहसीलदार जीवन देसाई यांच्या पुढाकारातून, लोकसहभागातून काढण्यात आला. कित्येक वर्षे जे लोकप्रतिनिधींना शक्य झाले नाही ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करून दाखविले आहे. लोकसहभागातून अन्नपूर्णा नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ प्रांताधिकारी संतोष भिसे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी चिरेखाण मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद साटम, सेक्रेटरी काका जेठे, खजिनदार बाबा कोकरे, मिठबाव सरपंच जयकुमार नारिंग्रेकर, दहिबाव सरपंच शरद परब, नारिंग्रे सरपंच स्वाती बापट, शरद ठुकरूल, योगेश चांदोस्कर आदी उपस्थित होत. नदीतील गाळ लोकसहभागातून काढण्याचे महत्त्वाचे पाऊलएप्रिलपासून उष्म्याचा जोर वाढू लागला. मे महिन्याच्या प्रारंभीच तीव्र उष्मा जाणवू लागला असून त्यामुळे पाण्याची पातळीही घटत आहे. अशा स्थितीत देवगड नळयोजनेच्या जलवाहिनीची गळती हा गंभीर प्रश्न दरवर्षी उद्भवत आहे. गळतीमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने देवगड जामसंडे भागातील नळग्राहकांना पाण्याची चणचण भासत आहे. तसेच विद्युतपुरवठा अचानक खंडित झाल्यास अथवा पंपिंग यंत्रणेत बिघाड झाल्यास पाणीपुरवठा बंद होतो. याच कालावधीत देवगड अथवा जामसंडे गावांना पाणीपुरवठा करण्याचा दिवस असेल तर पाणीपुरवठा होत नाही. दरम्यान, एक दिवस आड करून पाणीपुरवठा केला जात असल्याने यापैकी एका गावाला तीन ते चार दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.देवगड जामसंडे ही दोन्ही गावे कातळावर वसल्याने व समुद्राच्या नजीक असल्याने या भागात उन्हाचे चटके बसू लागल्यावर पाण्याची पातळीही कमी होत जाते. परिणामत: विहिरी आटतात. विंंधन विहिरींमधूनही पाणी मिळत नाही. पाण्याचा इतर कुठलाही स्रोत नसल्याने या दोन गावांना पाण्यासाठी नळयोजनेवरच विसंबून राहावे लागते. देवगड तालुक्यात देवगड जामसंडे ही सर्वांत जास्त लोकसंख्येची गावे आहेत. दिवसेंदिवस तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या या गावामध्ये झपाट्याने वसाहती वाढत असून शहरीकरणाच्या वाढीमुळे पाण्याचा प्रश्नही बिकट झाला आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी व प्रांताधिकारी संतोष भिसे यांच्या सहकार्यातून या दोन गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दहिबाव नदीतील गाळ लोकसहभागातून काढण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे तहसीलदार जीवन देसाई यांनी सांगीतले.++नदीपात्रात धूप प्रतिबंधक बंधारा बांधणार : देसाईमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून नदीच्या दुतर्फा धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रथम एका बाजूच्या बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन देसाई यांनी दिली. तसेच देवगड, जामसंडे, दहिबांव, तांबळडेग, बागमळा, हिंदळे, नारिंग्रे, किंजवडे, मिठबांव, कोटकामते, खुडी, मोर्वे या गावांना पाणीपुरवठा होतो त्या विहिरींचे गाळ काढण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.देसाई यांनी लोकसहभागातून केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुकसध्या कार्यरत असलेल्या नळयोजनेच्या मुख्य दुखण्यांकडे लक्ष दिल्यास पाण्याचा प्रश्न गंभीर होणार नाही, हा दृष्टिकोन ठेवून तहसीलदार जीवन देसाई यांनी लोकसहभागातून केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी दहिबाव नदीतील गाळ लोकसहभातून काढण्याच्या कामाला देवगड चिरेखाण मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
अन्नपूर्णा नदीतील गाळ काढला
By admin | Published: May 03, 2016 12:23 AM