कसई दोडामार्ग : आघाडी, युती सत्तेत असूनदेखील विकास करू शकले नाहीत. सध्या सत्तेत असलेले भाजप-सेना एकमेकांचा विरोध करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेचे कोकण संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत मनसेचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, महिला उपाध्यक्षा श्रेया देसाई, दोडामार्ग प्रभारी तालुकाध्यक्ष प्रभाकर गवस, दीपक देसाई, कणकवली तालुकाध्यक्ष समीर आचरेकर, सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष गवंडे, मनसेचे उमेदवार रामचंद्र ठाकूर, जीवन सावंत, सत्यवान नाईक, रवींद्र खडपकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दोडामार्ग-सावंतवाडा येथील मनसेच्या प्रचार कार्यालयात बुधवारी निवडणूक प्रचाराचा नारळ फोडून प्रारंभ केल्यानंतर उपरकर म्हणाले, माजी पालकमंत्री नारायण राणे आणि आताचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुकानिर्मिती झाल्यानंतर तालुक्याचा विकास काय केला? तालुक्यात पाणी, आरोग्य, रस्ते, शासकीय कार्यालये या सर्वच बाबींकडे दुर्लक्ष केले. तालुक्याचा विकास करण्यात हे चारही पक्ष अपयशी ठरले आहेत. सर्वसामान्यांना दाबून धनदांडग्यांना ते आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहेत, असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.मालवण नगरपंचायतीचा आराखडा तयार करण्यात आला, त्याला मनसेचा विरोध आहे. त्यामुळे जनतेवर एकप्रकारे अन्याय केला जात आहे. त्या पद्धतीने दोडामार्ग तालुक्यात नगरपंचायतीचा आराखडा तयार करीत असताना होता कामा नये. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, अन्याय दूर करण्यासाठी व यावर वचक ठेवण्यासाठी मनसेचे उमेदवार रिंंगणात आहेत. दोडामार्ग शहराबरोबर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या. सर्वसामान्य जनतेबद्दल असलेली तळमळ, समाजकार्याची असलेली आवड, असे उमेदवार मनसेने दिले असल्याचे उपरकर यांनी सांगितले. (वार्ताहर)
सत्ताधीशच एकमेकांविरोधात
By admin | Published: October 23, 2015 9:19 PM