ओरोस : प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टिबिल २०१४ मधील तरतुदीनुसार खासगी वाहनांसह टप्पा वाहतुकीला दिलेली परवानगी व इतर जाचक अटींविरोधात महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस संघटना (इंटक) सिंधुदुर्गने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन केले.महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स इंटक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांना निवेदन सादर करण्यात आले. यात असे नमूद आहे की, प्रस्तावित रस्ते वाहतूक विरोधकांमुळे राज्यपातळीवर, महानगरपालिका वाहतूक व्यवस्था निर्माण होणार आहे. यातील टेंडर पद्धतीमुळे एस. टी. महामंडळाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यातील टेंडर पद्धतीमुळे एस. टी. महामंडळाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. याचा फटका कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना बसणार आहे. तसेच प्रवाशी वाहतूक करण्याकरीता टेंडर काढण्याची पद्धत निर्माण झाल्यास त्यामध्ये सार्वजनिक प्रवाशी वाहतूक संस्थासोबत खासगी कंपन्या भाग घेऊ शकतील. त्यामुळे त्या भागात जास्त प्रवाशी वाहतूक आहे ते मार्ग खासगी मालक पैशाच्या बळावर विकत घेतील व प्रवाशांची वाहतूक करतील. असे झाल्यास ज्याठिकाणी मार्गावर विशेष प्रवाशी नाहीत त्याठिकाणी एस. टी. महामंडळाला प्रवाशी वाहतूक करावी लागेल. परिणामी कमी प्रवाशांमुळे एस. टी. महामंडळ तोट्यात येणार आहे. तसेच औद्योगिक कलह अधिनियम १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार मोडित काढण्यात यावा आणि एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी या मागणीसह प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टीबिल २०१४ मधील एस. टी. ला जाचक असणाऱ्या अटी व शर्ती वगळण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स संघटनेच्या इंटक काँग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. त्यावेळी ‘एस. टी. वाचवा’च्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी महाराष्ट्र कार्याध्यक्ष एस. बी. रावराणे, विभागीय अध्यक्ष अशोक राणे, कृष्णा राणे, आशिष काणेकर, अनिल लोकरे, भाई राणे, लियाकत शेख, दत्ता पाताडे, संदीप सावंत, पूजा फोंडेकर, प्रणिता मुणगेकर, हेमंत इंगळे, किरण पाटील, हेमंत तळवडेकर यांच्यासह १२५ ते १५० एस. टी. संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी या संघटनेत सामील झाले होते. (वार्ताहर)एकजूट दाखवाएस. टी. लाही लोकवाहिनी म्हणतात. यामध्ये सर्व जातीधर्माचे लोक सेवा घेतात. गेल्या १५ वर्षात एस. टी. तोट्यात आहे. तरीही गेल्या १५ वर्षांमध्ये सेवा बंद पडू दिली नाही. आपण सर्वांनी एकजूट दाखवावी असे अनेक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या भाषणात बोलून दाखविले.
एस. टी. वर्कर्स संघटनेचे आंदोलन
By admin | Published: February 11, 2015 11:05 PM