सावंतवाडी : अतिशय प्रतिष्ठितेचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीसाठी ‘उजव्या सोंड्यांच्या बाहुल्या’ या कादंबरीला शनिवारी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कादंबरीचे लेखक प्रविण बांदेकर यांनी स्वीकारला. दिल्लीतील कमानी सभागृहात साहित्य अकादमी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा पुरस्कार सोहळा नामवंत साहित्यिक उपमन्यु चटर्जी, साहित्य अकादमीचे नवनियुक्त अध्यक्ष माधव कौशिक तसेच नवनियुक्त उपाध्यक्ष कुमुद शर्मा आणि सचिव के.श्रीनिवास राव यांच्यासह 24 भाषेतील पुरस्कारार्थी साहित्यीक याच्या उपस्थितीत पार पडला.मराठी भाषेसाठी ‘उजव्या सोंड्याच्या बाहुल्या’ या प्रायोगिक कादंबरीला वर्ष 2022 चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोंकणी भाषेसाठी माया खरंगटे यांना त्यांच्या कोकणी भाषेतील ‘अमृतवेळ ‘ या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला.
प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरी विषयी उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही एक प्रायोगिक कादंबरी आहे. या कादंबरीचा विषय समकालीन संस्कृती वरच्या संकटाचे नाट्यमय चित्रण यात केलेले आहे. कोकणात लोकप्रिय असलेल्या चित्रकृती सारख्या लोककला प्रकारांचा उत्कृष्ट वापर केल्याने कादंबरीचे कथन तंत्र नाविन्यपूर्ण झालेले आहे. कादंबरीत अधून मधून कोकणी बोलींच्या कलात्मक वापराने कादंबरीची कथनशैली समृद्ध झाली आहे. स्वतःची ओळख हरवून बसलेल्या विचारवंतांच्या नोस्टॅलीजीयाचे चित्रणअतिशय संवेदनशीलतेने केलेले आहे. या सर्व कथनामुळे उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही मराठी साहित्यकृती विशेष ठरली आहे.