शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

सह्याद्रीचा पायथा तहानलेल

By admin | Published: February 02, 2015 10:37 PM

लांजा तालुका : साडेचार लाख रुपयांचा होतो खर्च, तरीही १२ गावांचा घसा कोरडाचाच

अनिल कासारे - लांजा --सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वत रांगा... डोंगरामध्ये वसलेल्या वाड्या, वस्त्या, लांजा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता डोंगरावर पडणाऱ्या धो... धो... कोसळणाऱ्या या पावसाचे पाणी सरळ समुद्राला जाऊन मिळत असल्याने सह्याद्रीच्या पायथ्याशी तालुक्यातील पूर्व भागातील गावांना एप्रिल - मे महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. तालुक्यात एकूण १२ गावे व ४० वाड्यांना या महिन्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यासाठी जवळजवळ साडेचार लाख रुपये वर्षाला खर्च येतो. लांजा तालुका डोंगर, दऱ्या-खोऱ्यामध्ये वसलेल्या वाडी - वस्त्या आहेत. तालुक्यात एकूण १२ धरणे पूर्ण आहेत, तर २ धरणांचे काम ५० टक्के झालेले आहे. पूर्व भागामध्ये एप्रिल व मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या या गावांना पाण्याची टंचाई होते. लांजा तालुक्यात पालू आणि कोचरी गावाला दरवर्षी पाणीटंचाई भासते. पालू व कोचरी ही दोन्ही गावे सह्याद्रीच्या पायथ्याशी आहेत. दोन्ही गावांच्या माथ्यावर माचाळ आहे. दोन्ही गावाच्या मध्य स्थानातून पावसाळ्यात नदी वाहाते. मात्र, उन्हाळ्यात या नदीमध्ये पाणीच नसते. या नदीवर मोठे धरण झाले व येथे वसलेल्या डोंगरावर वाड्या आहेत. त्यांना नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा होऊ शकतो.डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी सरळ समुद्राला जाऊन मिळते. या ठिकाणी पाणी अडवले जात नसल्याने भूगर्भातदेखील पाणी नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पालू गावातील चिंचुर्टी धावडेवाडी, हुंबरवणे, कोचरी गावात भोजवाडी, धनगरवाडी, बौद्धवाडी, सुतारवाडी, डाफळेवाडी, तरळवाडी, बेंद्रेवाडी आदी या दोन गावातील १३ वाड्यांना एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पालू गावातील या वाड्यांना एप्रिल व मे महिन्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. पालू - धावडेवाडी येथे शिवकालीन योजनेंतर्गत पालू, चिंचुर्टी, धावडेवाडी येथे पावसाचे पाणी साठवून ठेवण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. डिसेंबर २०१३ मध्ये पूर्ण झाले आहे. या वाडीला कायमस्वरुपी पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने सध्या मंजूर असलेले पालू गावातील धरण हे युद्धपातळीवर पूर्ण झाल्यास येथील २०१ ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. या ठिकाणी सध्या सार्वजनिक विहीर व बोअरवेल आहे. मात्र, मे महिन्यात पालू - हुंबरवणे या वाड्यांतील लोकांना माचाळवरुन नळपाणी पुरवठा योजनेमधून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला होता. मात्र, माचाळ येथील ग्रामस्थांनी पालू आणि हुुुंबरवणे येथील ग्रामस्थांना पाणी देण्यास नकार दिल्याने या योजना बंद आहे. ही योजना २० वर्षांपूर्वीपासून कार्यरत आहे. आजघडीला या योजनेची साठवण टाकी व पाईपलाईन बऱ्याच ठिकाणी लिकेज आहे. कोचरी भोजवाडी - राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत शाश्वत योजनेंंतर्गत वाडीसाठी पाऊस पाणी संकलन करण्याचे काम नुकतेच पूर्ण झालेले आहे. परंतु वाडीनजीकच्या झऱ्याचे वृद्धीकरण केल्यास पुरेसे पाणी उपलब्ध होऊन येथील १२० ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. कोचरी - धनगरवाडी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत शाश्वत योजनेअंतर्गत झरा वृद्धीकरण करण्याचे काम मंजूर झाले आहे. तसेच येथील विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येथील २९ लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कोचरी-बौद्धवाडी येथे सार्वजनिक विहीर असून, पाणी अपुरे आहे.कोचरी - तरळवाडी व बेंद्रेवाडी येथे सार्वजनिक विहीर व बोअरवेल आहे. एप्रिल - मे महिन्यामध्ये पाण्याची पातळी घटते. त्यामुळे पाणीटंचाई भासते. यावर्षीदेखील ११२ ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. भविष्यात धरण होईल. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत धरणावरुन पाणीपुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे. विवली धनगरवाडी डोंगरात उंच भागावर वसलेली आहे. या ठिकाणी १५ लोकवस्तीचे एकच कुटुंब आहे. गोळवशी - खांबडवाडी शिवकालीन पाणीसाठवण योजनेंतर्गत सार्वजनिक विहीर सन २०११ मध्ये पूर्ण झाली आहे. परंतु विहिरीतील पाणीसाठा अपुरा असल्याने या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या वाडीसाठी सन २०१४-१५मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत अंदाजपत्रक तयार करून पुढील कार्यवाहीसाठी विभागीय कार्यालयात पाठविण्यात आले आहे. या ठिकाणी ३८८ लोकवस्तीची वाडी असल्याने यावर्षीदेखील टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. गोळवशी - भवानी उत्सव वीरवाडी या ठिकाणी सार्वजनिक विहीर आहे. मात्र, यावर्षी राष्ट्रीय पेयजल आराखड्यातून विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. गोळवशी - बौद्धवाडी व वरचीवाडी येथे विहिरीचे काम झाल्यानंतर पाणीपुरवठा होणार आहे.वाडगाव हसोळ या ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील तीन वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचते. येथे १२७ लोकवस्ती आहे. या गावातील गुजरवाडीमध्ये जुनी सार्वजनिक विहीर व विंंधन विहीर आहे. एप्रिल - मे महिन्यात पाणी कमी पडते. या वाडीसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून सार्वजनिक विहीर दुरुस्तीचे काम सुरू आहे.या वाडीत २२ ग्रामस्थ वस्ती करत असून, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत नपापु योजना राबवण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१२मध्ये ती पूर्ण झाली. मात्र, पाणी अपुरे असल्याने एप्रिल - मे महिन्यात पाणीटंचाई भासते. कोंडवाडीमध्ये ७६ लोकवस्ती असून, सार्वजनिक विहीर आहे. पाणी अपुरे पडत असल्याने या वाडीसाठी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत नपापु योजनेचे काम सुरु असून, पंपिंग मशिनरी बसविणे व वीज कनेक्शन घेण्याचे काम बाकी आहे. मार्च महिन्यामध्ये वीज कनेक्शन, पंप न बसल्यास टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.वनगुळे - खालचीवाडी येथे ३९८ लोकवस्तीची वाडी असून, विहिरीवरुन पाणीपुरवठा योजना आहे. मात्र, एप्रिल व मे महिन्यामध्ये पाणीटंचाई भासते. कोंड्ये - बाऊळवाडी येथे ११० लोकवस्ती असून, सार्वजनिक विहीर आहे. विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता. भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक विहीर पूर्ण झालेली आहे.कणगवली येथील तेलीवाडी, शिंदेवाडी, बौद्धवाडी अशा तीन वाड्यांची १६१ घरे आहेत. तेथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना आहे. वीजबिल न भरल्यामुळे ही योजना बंद आहे. त्यामुळे तिन्ही वाड्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र, ग्रामपंचायती स्तरावर हालचाल करायला हवी ती करण्यात येत नसल्याने याचा फटका ग्रामस्थांना बसला आहे.प्रभानवल्ली येथील ३३१ लोकवस्ती असणाऱ्या गणेश खोरेवाडीसाठी नळपाणी योजना असून, सद्यस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत असला तरी एप्रिल - मे महिन्यात पाण्याची चणचण भासते. बौद्धवाडीत १३२ घरे आहेत. ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना असून, देखभालीअभावी योजना बंद आहे.रिंगणे - हांदेवाडी व खडकवाडी येथे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून सदर वाड्यांसाठी पूरक नळपाणी योजना करण्यासाठी काम प्रस्तावित करण्यात आली असून, ६७८ लोकवस्तीच्या या वाडीला पाण्यासाठी वणवण करावी लागते. रिंगणे - कोंडगाव येथे ३९० लोकवस्ती असून, या ठिकाणी जलस्वराज्य योजनेंतर्गत रिंगणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात विहीर खोदून त्यावरून नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात आली होती. योजनेच्या उद्धरण वाहिनीची पाईपलाईन जागोजागी गळती होत आहे. जलस्वराज्य योजना ग्रामपंचायतीकडे अद्याप हस्तांतरीत झालेली नाही. लांजा तालुक्यातील पूर्व विभागात जास्त पाणीटंचाई भासत आहे. तालुक्यात एकूण १२ गावे ३० वाड्यांमध्ये दरवर्षी पाण्याची टंचाई भासते. तसेच आणखीन काही गावे आहेत. तिथे पाण्याची टंचाई भासते. तसेच आणखी काही गावे आहेत, तिथे पाण्याची टंचाई भासते.पालू हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील सर्वच वाड्यांना एप्रिल महिन्यापासून पाण्याची टंचाई भासते. त्यामध्ये १३५ लोकवस्ती असणाऱ्या बौद्धवाडीमध्ये नळपाणी योजना असून, उद्भवाचे पाणी एप्रिल मे महिन्यामध्ये कमी पडते. येथे ग्रामपंचायतीने मारलेल्या बोअरवेलवरुन पंचायत समितीच्या सेस फंडाअंतर्गत लघु पाणीपुरवठा योजना नुकतीच पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत विहीर वृद्धीकरण कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. पालू - खाकेवाडी, बेंडलवाडी येथे त्या मानाने पाणीटंचाई कमी आहे.हर्दखळे, सुकाळवाडी, धनगरवाडी येथे ३६ घरांची लोकवस्ती असून, सदर वाडी उंचावर आहे. तेथे जलस्वराज्य योजनेअंतर्गत सन २००५-०६मध्ये सुमारे ५ लाख रुपये खर्च करून तळी बांधण्यात आलेली होती. परंतु या तळीचे पाणी एप्रिलनंतर कमी होत असल्याने टंचाइ जाणवते.कोंडगे - धनगरवाडी (पालढोक) येथे गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवली होती. येथे सार्वजनिक विहीर आहे. ही वाडी उंचावर असल्याने विहिरीचे पाणी येथील १२५ लोकवस्ती असणाऱ्या या वाडीला आतापर्यंत पुरत होते. वाडीपासून खाली नवीन उद्भव घेऊन त्यावरुन पाणीपुरवठा योजना आवश्यक आहे किंवा पाणी संकलन साठवण टाकी बांधून प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. कुरंग - पठारवाडी १२० लोकवस्ती असणारी वाडी असून, येथे गेल्या वर्षी प्रथमच पाण्याची टंचाई भासली होती. पारंपरिक पाण्याचा डुरा आहे. या झऱ्याजवळ जिल्हा परिषदेमार्फत विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु या विहिरीमध्ये पाणी जास्त साठत नाही. याठिकाणी वाडीतील पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी कुरंगच्या बंद असलेल्या जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवरुन पठारवाडीसाठी स्वतंत्र नळपाणी योजना करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यासाठी जलस्वराज्य टप्पा क्र. २ मधून चौथ्या वित्त आयोगांतर्गत काम प्रस्तावित आहे. पंचायत समिती स्तरावरुन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यात ७७ विंधन विहिरी, १४ पाणीपुरवठा योजना करणे अपेक्षित आहे. १ तळी बांधणे, २ नपापु योजना, विहिरींतील गाळ काढणे, २ विहिरी वृद्धीकरण, ६ उद्भव वृद्धीकरण, १ उद्भव खोलीकरण, १ नपापु योजना राबवणे, यासाठी अंदाजे १ कोटी ४७ लाख ५० हजार एवढा खर्च अपेक्षित आहे. टंचाई कालावधीत एकूण १२ गावांतील ४० वाड्यांमधील ७ खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात येणार आहेत. टँकरसाठी दरवर्षी साडेचार लाख रुपये खर्च होतो, तो थांबवता येईल.नेतृत्वहीन लांजालांजा तालुका विकासापासून वंचित आहे. त्याचे कारण म्हणजे तालुक्याला नेतृत्व नसल्याने या तालुक्यातील विकासाला चालना मिळालेली नाही. माजी आमदार कै. शिवाजीराव सावंत यांच्या कालावधीत लांजा तालुक्यात छोटी-मोठी धरणे आणि पाझर तलाव झाले आहेत. त्यानंतर हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच धरणे लांजा तालुक्यात झाली. मात्र, त्यांची कामे अद्याप रखडलेली असल्याचे दिसून येते. पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग होताना दिसून येत नाही....तर माचाळचा प्रश्न सुटेलमाचाळ ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार राष्ट्रीय ग्रामीण पेयजलअंतर्गत या वाडीचा समावेश असून, योजना दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने माचाळ या ठिकाणी छोटी विहीर घेऊन त्यावर सौरऊर्जेच्या सहाय्याने चालू असलेल्या गुरुत्ववाहिनीच्या चेंबरमध्ये पाणी आणणे तसेच जुनी पाईपलाईन बदलणे व २ सिंटेक्स टाक्या घेणे विषयीचे अंदाजपत्रक विभागीय स्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. याठिकाणी असणाऱ्या २४५ ग्रामस्थांच्या पिण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघू शकतो.कॅनलच नाहीकॅनल नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे येथील शेतकरी उन्हाळी शेती करत नाहीत. शेतकऱ्यांच्या घरी समृद्धी नांदायची असेल तर येथे असणारी धरणे व पाझर तलाव यांच्या पाण्याचा नियोजनबद्ध आराखडा तयार करुन त्याच्यावर नियंत्रण ठेवणे काळाची गरज आहे.विंधन विहिरी प्रस्तावितकोचरी - बौद्धवाडी, डाफळेवाडी या ठिकाणी ५० हजार रुपयांच्या नवीन विंधन विहिरी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. कोचरी - भोजवाडी व धनगरवाडी येथे पाण्याचा उद्भव वृद्धीकरण करण्यासाठी ८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित ठेवून ही कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.यंदा जादा वाड्या प्रस्तावितगेली चार ते पाच वर्षांपासून लांजा तालुक्यात १२ गावांमधील ३० ते ३५ वाड्यांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे. मात्र, त्यामध्ये प्रशासनाने उपाययोजना करुन पाण्याची उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.