सावंतवाडी : शहरातील बाहेरचावाडा येथील भक्तांचे श्रद्धास्थान सद्गुरू मियाँसाब यांचा ७३ वा पुण्यतिथी उत्सव सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी सद्गुरूंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती.हिंंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून मियाँसाब हे देवस्थान प्रसिद्ध आहे. सावंतवाडी-कुडाळ महामार्गाला लागून बाहेरचावाडा येथे हे श्रध्दास्थान आहे. सोमवारी मियाँसाब यांची १३ वी पुण्यतिथी हिंंदू आणि मुस्लिम भक्तांनी एकत्र येत साजरी केली.यानिमित्त सकाळी पुरोहिताकडून समाधीची पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर नैवेद्य व दुपारी ११ वाजता समाधीवर चादर अर्पण करण्यात आली. यावेळी सद्गुरू मियाँसाब यांच्या नावाचा जयजयकार करण्यात आला.दुपारी आरतीनंतर महाप्रसाद झाला. सद्गुरू मियाँसाब यांचा भक्त परिवार दूरवर पसरला आहे. आजच्या उत्सवाला महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक राज्यातून भक्तांनी हजेरी लावली होती. सायंकाळी उशिरापर्यंत भक्तांची वर्दळ होती. त्यामुुळे परिसर भक्तीभावाने फुलून गेला होता.
सिंधुदुर्ग: सावंतवाडी शहरात मियाँसाब पुण्यतिथी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 5:18 PM
सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा येथील भक्तांचे श्रद्धास्थान सद्गुरू मियाँसाब यांचा ७३ वा पुण्यतिथी उत्सव सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी सद्गुरूंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती.
ठळक मुद्देसावंतवाडी शहरात मियाँसाब पुण्यतिथी साजरीमाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी केली गर्दी