बांदा : रासायनिक खतांच्या गोणीवरील छापील किमतीपेक्षा कुणी जास्त किमतीने खत विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांना मूळ रकमेनुसारच खतविक्री करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, असे सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी माधुरी मुटके यांनी सांगितले.छपाई किमतीपेक्षा जादा किंमत आकारता येत नाही. रासायनिक खतांच्या काही ग्रेडच्या किमती वाढल्या असल्या तरी जुन्या दराची खते जुन्याच दराने शेतकऱ्यांना विकणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्यांना पावती देणे बंधनकारक आहे. कुणी विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकल्यास शेतकरी तत्काळ सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्याकडे तक्रार करू शकतात असे मुटके म्हणाल्या.सावंतवाडी तालुक्यात सम्राट खताची मोठी मागणी आहे. परंतु या खताच्या गोणीवर छापील किंमत १२०० रुपये असून विक्रेत्यांकडून २००० रुपयांप्रमाणे विक्री होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा कृषी सेवा केंद्रात जास्त दराने खत विक्री होत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे यांनी केली आहे.तफावतीतील रक्कम देण्याची मनसेची जबाबदारीशेतकऱ्यांनी दुकानदाराकडून छापील पावती घेणे आवश्यक आहे. गोणीवरील किंमत व विक्री केलेल्या रकममेत तफावत दिसल्यास शेतकऱ्यांना वरील उर्वरित वक्कम देण्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राहील, असेही गुरूदास गवंडे यांनी सांगितले.
रासायनिक खतांची विक्री :छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 3:36 PM
Agriculture Sector Sindhudurg : रासायनिक खतांच्या गोणीवरील छापील किमतीपेक्षा कुणी जास्त किमतीने खत विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांना मूळ रकमेनुसारच खतविक्री करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, असे सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी माधुरी मुटके यांनी सांगितले.
ठळक मुद्देरासायनिक खतांची विक्री :छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारल्यास कारवाई विक्रेत्यावर गुन्हा दाखल होणार; कृषी अधिकाऱ्यांची माहिती