शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

वाळू उत्खननाच्या निविदा भरणार नाही!वाळू व्यावसायिकांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 8:15 PM

sand Sindhudurgnews- शासनाने प्रति ब्रास वाळूचा दर वाढवून २ हजार ११४ रुपये केल्याने वाळू व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वाळू व्यावसायिक संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे वाळू दर कमी करण्याची मागणी केली जाणार आहे. असहकार म्हणून आम्ही वाळू उत्खननाची कोणतीही निविदा भरणार नाही, अशी भूमिका जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांच्यावतीने काका कुडाळकर व बाबा परब यांनी मांडली.

ठळक मुद्देवाळू उत्खननाच्या निविदा भरणार नाही!वाळू व्यावसायिकांची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा करणार

मालवण : शासनाने प्रति ब्रास वाळूचा दर वाढवून २ हजार ११४ रुपये केल्याने वाळू व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वाळू व्यावसायिक संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे वाळू दर कमी करण्याची मागणी केली जाणार आहे. असहकार म्हणून आम्ही वाळू उत्खननाची कोणतीही निविदा भरणार नाही, अशी भूमिका जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांच्यावतीने काका कुडाळकर व बाबा परब यांनी मांडली.वाळू दरवाढीच्या विरोधात चर्चा करण्यासाठी व्यावसायिकांची बैठक मालवण चिवला बीच येथील हॉटेल सिल्वर सँड येथे पार पडली.यावेळी संतोष गावकर, श्याम वाक्कर, राजन बोभाटे, प्रवीण खोत, बाबू तोरसकर, संदेश पवार, भाऊ हडकर, वीरेंद्र भिसळे, सिद्धेश परब, घन:श्याम प्रभू, प्रकाश मेस्त्री, संदेश मटकर, प्रसाद वालावलकर, चिन्मय चिंदरकर, संदेश वेतुरेकर, संतोष चिपकर, योगेश नाईक, तानाजी माडये, विराज वस्त, प्रकाश तोंडवळकर, सिद्धार्थ तोंडवळकर, आशिष शेलटकर, मनमोहन डिचोलकर, साईनाथ माडये, नाईक आदी उपस्थित होते. शासन अशाप्रकारे वाळू व्यावसायिकांची गळचेपी करीत असल्याचा आरोप करण्यात आला.११०० रुपये दर पाहिजे : कुडाळकरकाका कुडाळकर म्हणाले, सिंधुदुर्गात स्थानिकांना रोजगार मिळावा या शासन धोरणानुसार हातपाटीने वाळू काढली जाते. ३०० रुपये दराप्रमाणे नियमित १५ टक्के वाढ झाली असती, तर आज वाळूदर १२०० रुपयांपर्यंत आला असता. मात्र, शासनाने दोन वेळा दरात अचानक वाढ करीत आज २१०० रुपये दर केला आहे. वाळूदर वाढल्यास छोटे व्यावसायिक बाजूला होऊन धनदांडगे एकत्र येऊन व्यवसाय करतील. म्हणूनच प्रति ब्रास वाळूचा दर ११०० रुपये इतका निश्चित झाला पाहिजे.ग्राहकांना वाळू कोणत्या दराने द्यायची? : परबबाबा परब म्हणाले, वाळू दर आणि दोन ब्राससाठी काढावा लागणारा पासचा खर्च, तसेच कामगारांचे प्रतिब्रास वेतन यांचा हिशेब घातला असता वाळूचा बाजारभाव दहा हजारांच्या वर पोहोचतो. त्यामुळे ग्राहकांनाही वाळू कोणत्या किमतीने द्यायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे १ हजार ४८४ रुपये प्रति ब्रास हा दर प्रस्तावित केला होता. हाही दर आम्हांला मान्य नाही. वाळू दराबाबत दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली जाणार आहे.

टॅग्स :sandवाळूcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग