कणकवली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील वर्तनामधून त्यांची संस्कृती जगासमोर आली आहे. त्यांचे समर्थन नाईट लाईफच्या दुनियेत जगणारे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे करत आहेत. त्यांना राहुल गांधी याचे वर्तन बरोबर वाटणे साहजिकच आहे. कारण संजय राऊत यांना प्रेमातले फार कळते. असा टोला भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.कणकवली येथे प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले, काल संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ऐतिहासिक भाषण झाले. त्या भाषणाची मिर्ची विरोधी पक्षाला झोंबली. त्याचे परिणाम महाराष्ट्र राज्यात विरोधी पक्षात जाणवले. राहुल गांधी यांचे जे भाषण झालं त्याला भाषण म्हणायचं की कॉमेडी सर्कस असा सवालही त्यांनी केला.महिला अत्याचाराच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार राज्यपालांना भेटणार आहेत. हा मोठा विनोद आहे. त्यांनी आपल्या निवेदनात डॉ. पाटकर, दिशा सालियन यांच्यावर अन्याय झाला त्याची माहिती देवून चौकशीची मागणी करावी.
पत्रकार हल्ल्याबाबत समर्थन नाहीपत्रकार हल्ल्याबाबत कोणाचे समर्थन करणार नाही. मात्र संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना आमदारांवर टीका करण्याचा अधिकार नाही. त्यांच्या काळात किती पत्रकारांवर हल्ले झाले. ते हल्ले कोणी केले ? हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे या विषयी बोलण्याचा संजय राऊत यांना नैतिक अधिकार नाही.