कणकवली: भाजपाला रोखण्यासाठी त्याग करायला हवा असे संजय राऊत म्हणत आहेत. त्यांचा तो त्यागाचा संदेश उद्धव ठाकरे यांच्यासाठीच आहे असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादीत विलीन करण्याचा राऊत यांचा प्रस्ताव असल्याचेही ते म्हणाले.यावेळी बोलताना राणे म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिन्ह मशाल हे नवीन आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ आल्याने संघटना तळागाळात नेण्यासाठी आता वेळ कमी आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादीत विलीन करावा असा प्रस्ताव संजय राऊत यांनी ठेवल्याची माहिती मला उपलब्ध झाली आहे असेही ते म्हणाले.कोरोनाचा पैसा तिकडे घातला का? पंतप्रधान मोदी यांनी संसद भवन उभे केले आणि त्याचा लोकार्पण सोहळा जो केला, त्याने भारताच्या प्रत्येक पिढीला अभिमान वाटेल, असा हिंदू राष्ट्राला साजेसा असा सोहळा होता. त्यामुळे संजय राऊत यांना पोटशूळ उठला आहे. मातोश्री २ हा महाल ठाकरेंनी उभा केला त्यासाठी कुठून पैसा आला. कोरोनाचा पैसा तिकडे घातला का? याची उत्तरे त्यांनी द्यायला हवीत.मातोश्री २मध्ये कोणत्याच सेना नेत्यांना प्रवेश नाहीमातोश्री २ या नवीन महालामध्ये शिवसैनिकांना प्रवेश आहे काय? त्यात संजय राऊत यांना सुद्धा प्रवेश नाही. कोणत्याच सेना नेत्यांना आतमध्ये प्रवेश नाही. जर प्रवेश असेल तर तिथे जावून फोटो काढा आणि तो आम्हाला पाठवा असे आव्हानही राणे यांनी यावेळी दिले...तेव्हा विरोधी पक्षाला निमंत्रणे दिली नाहीतउध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी विरोधी पक्षाला निमंत्रणे दिली नाहीत. याची यादीच देता येईल. मेट्रोचे जाळे देवेंद्र फडणवीस यांनी विणले. ते विरोधी पक्ष नेते होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना निमंत्रण दिले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला सर्व परवानग्या फडणवीस यांनी आणल्या. मात्र, विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांना निमंत्रण दिले नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. असेही राणे म्हणाले.
राऊतांचा त्यागाचा 'तो' संदेश उद्धव ठाकरेंनाच!, नितेश राणेंनी लगावला टोला
By सुधीर राणे | Published: May 29, 2023 4:08 PM