कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग मार्फत देण्यात येणारे संतसेवा पुरस्कार ह.भ.प.दत्ताराम आकाराम साटम(करूळ वैभववाडी)व ह.भ.प.प्रकाश शंभा केळुसकर(आंबेगाव, सावंतवाडी) यांना जाहीर करण्यात आले आहेत.हा पुरस्कार २९ डिसेंबर रोजी कसाल गांगोची राई मठ येथे होणाऱ्या वारकरी मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे .सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग गेली ८ वर्षे निःपक्षपाती व कोणत्याही नेत्यांकडून आर्थिक मदत न घेता फक्त दानशूर व्यक्तीकडून व वारकऱ्यांच्या सहकार्याने हा जिल्हास्तरीय मेळावा घेत असते.या मेळाव्याला जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात वारकरी उपस्थित राहणार आहेत. त्याबाबत या बैठकीत नियोजन करण्यात आले.या बैठकीला जिल्हाध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर, उपाध्यक्ष हरीचंद्र पारधीये, खजिनदार ह.भ.प.मधुकर प्रभुगावकर, सचिव राजू राणे व प्रमुख वारकरी उपस्थित होते.
दत्ताराम साटम, प्रकाश केळुसकर यांना संतसेवा सन्मान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 3:57 PM
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग मार्फत देण्यात येणारे संतसेवा पुरस्कार ह.भ.प.दत्ताराम आकाराम साटम(करूळ वैभववाडी)व ह.भ.प.प्रकाश शंभा केळुसकर(आंबेगाव, सावंतवाडी) यांना जाहीर करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देदत्ताराम साटम, प्रकाश केळुसकर यांना संतसेवा सन्मान !सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे आयोजन