शहरं
Join us  
Trending Stories
1
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
2
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
4
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
5
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
6
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
7
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
8
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
9
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
10
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
11
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
12
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
13
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
14
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
15
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
16
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
17
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
18
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
19
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
20
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   

सरमळे, आरोस, मळगाव स्कूल प्रथम

By admin | Published: August 19, 2016 11:01 PM

देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा : बांदा येथील अभिनव दर्पण प्रतिष्ठानचे आयोजन

बांदा : अभिनव दर्पण प्रतिष्ठान बांदा तर्फे आयोजित देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या तीन गटांमधून १५ शाळांचे २० संघ सहभागी झाले होते. जिल्हा परिषद शाळा गटातून जिल्हा परिषद शाळा सरमळे, पाचवी ते सातवी गटातून विद्याविहार हायस्कूल, आरोस, तर आठवी ते दहावी गटातून मळगाव न्यू इंग्लिश स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला. अभिनव दर्पण प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या कार्यक्रमाचे यंदाचे हे सतरावे वर्ष आहे.स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक शशी पित्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी प्रा. विनय फातर्पेकर होते. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, पंचायत समिती सदस्य स्वप्निल नाईक, भाऊ वळंजू, नट वाचनालयाचे ज्येष्ठ सदस्य एस. आर. सावंत, प्रीतम हरमलकर, संदेश पटेकर, नाना कुुळकर्णी, शंकर नार्वेकर, प्रा. गणेश गर्दे, सुहासिनी तेंडोलकर, अभिनव दर्पणचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, उपाध्यक्ष मनोज मालवणकर व अन्य सदस्य उपस्थित होते. पारितोषिक वितरण नारायण पित्रे, भाऊ वळंजू, अजय महाजन, साईनाथ धारगळकर, सचिन नाटेकर, संदेश पटेकर, राकेश केसरकर, जयप्रकाश वाळके, नाना कुळकर्णी, विकास गोवेकर, सुनील राउळ, सुहासिनी तेंडोलकर, गुरुनाथ सावंत, हरिश्चंद्र भिसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नारायण आकेरकर, स्वाती मालवणकर, चंद्रकांत सावंत, टी. एम. बांदेकर, अरुण सुतार, रवींद्र गावडे, आशुतोष भांगले यांच्यासह अभिनवचे सर्व सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रसाद आंबिये, स्वागत ज्योती तेंडोलकर यांनी तर सूत्रसंचालन भक्ती आळवे व संतोष वावळिये यांनी केले. आभार मनोज मालवणकर यांनी मानले. (प्रतिनिधी)स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणेजिल्हा परिषद शाळा गट- जिल्हा परिषद कास शाळा नंबर १ (द्वितीय), जिल्हा परिषद शाळा बांदा नंबर १ (तृतीय), उत्तेजनार्थ-जिल्हा परिषद शाळा हिर्लोक व जिल्हा परिषद शाळा वाफोली नंबर १. पाचवी ते सातवी गट- न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा (द्वितीय), मळगाव न्यू इंग्लिश स्कूल (तृतीय), उत्तेजनार्थ- नेमळे पंचक्रोशी हायस्कूल व खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा. आठवी ते दहावी गट- विद्याविहार हायस्कूल, आरोस (व्दितीय), न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा (तृतीय), उत्तेजनार्थ- नेमळे पंचक्रोशी हायस्कूल व रामेश्वर विद्यालय, घावनळे.प्रश्नमंजूषा स्पर्धाकार्यक्रमादरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत श्रीयश वावळिये, मधुकर जाधव, पलक मयेकर हे विद्यार्थी विजेते ठरले. समूहगीत स्पर्धेचे परीक्षण संध्या कामत व प्रा. एन. डी. कार्वेकर यांनी केले. कार्यक्रमात अरविंद मालवणकर, निनाद सावंत, अरविंद भांगले, दिव्यता कोकाटे, सिमरन तेंडोलकर व आकांक्षा सावंत या बालचमूने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणेजिल्हा परिषद शाळा गट- जिल्हा परिषद कास शाळा नंबर १ (द्वितीय), जिल्हा परिषद शाळा बांदा नंबर १ (तृतीय), उत्तेजनार्थ-जिल्हा परिषद शाळा हिर्लोक व जिल्हा परिषद शाळा वाफोली नंबर १. पाचवी ते सातवी गट- न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा (द्वितीय), मळगाव न्यू इंग्लिश स्कूल (तृतीय), उत्तेजनार्थ- नेमळे पंचक्रोशी हायस्कूल व खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा. आठवी ते दहावी गट- विद्याविहार हायस्कूल, आरोस (व्दितीय), न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा (तृतीय), उत्तेजनार्थ- नेमळे पंचक्रोशी हायस्कूल व रामेश्वर विद्यालय, घावनळे.प्रश्नमंजूषा स्पर्धाकार्यक्रमादरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत श्रीयश वावळिये, मधुकर जाधव, पलक मयेकर हे विद्यार्थी विजेते ठरले. समूहगीत स्पर्धेचे परीक्षण संध्या कामत व प्रा. एन. डी. कार्वेकर यांनी केले. कार्यक्रमात अरविंद मालवणकर, निनाद सावंत, अरविंद भांगले, दिव्यता कोकाटे, सिमरन तेंडोलकर व आकांक्षा सावंत या बालचमूने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.