कुडाळ,- परजिल्ह्यातून तसेच परराज्यातून प्रशासकीय परवानगीने गावात येणाऱ्या ग्रामस्थांच्या नियोजना साठी सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटना सकारात्मक असुन त्यानी गावपातळीवर नियोजन सुरू केले आहे. कोरोना विषणानुजन्य साथरोग(उडश्कऊ19) पार्श्वभूमीवर इतर जिल्हाराज्य किंवा परदेशातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी येणाऱ्या लोकांच्या अलगीकरन आणि व्यवस्थे साठी 4मे रोजी जिल्हाधिकारी श्रीमती के मंजु लक्ष्मी यांचेशी जिल्ह्यातील सरपंच संघटनेची बैठक पार पडलीजि.प.उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या उपस्थितीतहेमंत वसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. आणि दिपाली पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच हेमंत खलीपे जिल्हाआरोग्य अधिकारी आणि एकनाथआंबोकर शिक्षणाधिकारी यांच्याशी सरपंच संघटना पदाधिकारी यांची सकारात्मक चर्चा झाली..*
झालेल्या चर्चेनंतर सर्व चर्चेचे निवेदन तयार करून मेल वर पाठविण्यात आले आहे. या वेळी उपस्थित सरपंच संघटना पदाधिकारी पुढीलप्रमाणे, प्रेमानंद देसाई अध्यक्ष, दादा साईल जिल्हा सरचिटणीस, जिल्हा संघटक दाजी राणे, सुरेश गावडे, कणकवली तालुका अध्यक्ष संतोष राणे, प्रमोद गावडे सावंतवाडी, नागेश परब कुडाळ, वैभव साळसकर देवगड, सुरेश राऊळ वेर्ले, वासुदेव जोशी नाणोस, गुणाजी गावडे वेत्ये, प्रसाद राणे पिसेकामते, साक्षी परब कळसुली, शुभांगी राणे दहीबांव, पारकर कोटकामते, उडील नर हे सरपंच उपस्थित होते.