शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
2
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
4
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
6
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
7
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
8
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
9
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
10
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
11
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
12
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
13
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
14
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
15
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
18
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
19
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय

सरपंचांना तत्काळ कोरोना लस द्यावी : राजेंद्र म्हापसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 6:45 PM

कोरोना कालावधीत गाव पातळीवर आपला जीव धोक्यात घालून सरपंचांनी विशेष काम केले आहे. तसेच अद्यापही सुरू आहे. त्यामुळे सरपंचांना तत्काळ Corona vaccine Sindhudurgnews- कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी आरोग्य समिती सभेत करण्यात आली. तशा सूचनाही जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत दिल्या. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती तथा प्रभारी अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी येथील बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात केली.

ठळक मुद्देसरपंचांना तत्काळ कोरोना लस द्यावी : राजेंद्र म्हापसेकर आरोग्य समिती सभेत मागणी : जीव धोक्यात घालून काम

ओरोस : कोरोना कालावधीत गाव पातळीवर आपला जीव धोक्यात घालून सरपंचांनी विशेष काम केले आहे. तसेच अद्यापही सुरू आहे. त्यामुळे सरपंचांना तत्काळ कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी आरोग्य समिती सभेत करण्यात आली. तशा सूचनाही जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत दिल्या. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती तथा प्रभारी अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी येथील बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात केली.यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, समिती सदस्य प्रितेश राऊळ, लॉरेन्स मान्येकर, उन्नती धुरी, राजेश कविटकर, हरी खोबरेकर आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. शासनाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू केले असल्याची माहिती सभेत देण्यात आली.

यावेळी लसीकरण करण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षित जागा आणि आवश्यक कर्मचारी आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असतील तर लसीकरणाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होणार नाही. त्यामुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्‍यक कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करावी, असा ठराव सभेत घेण्यात आला.ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांचे मोठे योगदानकोरोना काळात सर्व सरपंचांसह ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांनी आपले जीव धोक्यात घालून काम केले आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यानंतर प्राधान्याने सर्व सरपंचांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्या. त्याचप्रमाणे ग्राम सुरक्षा दलाच्या सर्व सदस्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस प्राधान्याने द्या, अशा सूचना सभापती म्हापसेकर यांनी केल्या.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसsindhudurgसिंधुदुर्ग