शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

साठे साहित्य संमेलन सावंतवाडीत होणे भाग्याच

By admin | Published: January 15, 2015 10:10 PM

बबन साळगावकर : तयारी अंतिम टप्प्याते

सावंतवाडी : सहावे राज्यव्यापी कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन सावंतवाडी येथे होत असल्याने सावंतवाडीकरांसाठी ही भाग्याची गोष्ट आहे. संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच विविध क्षेत्रातील सुमारे पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यासाठी नगरपरिषदेतर्फे सर्व नगरसेवक या संमेलनाच्या सहकार्यासाठी वेळोवेळी उपस्थित राहणार असल्याचे सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत साळगावकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, प्राध्यापक प्रवीण बांदेकर, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, हरिहर वाटवे, सुमेधा नाईक, नगरसेविका वैशाली पटेकर, कीर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, क्षिप्रा सावंत, अफरोज राजगुरू आदी उपस्थित होते.अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन १७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षपदी सतीश काळसेकर आहेत. महाराष्ट्र, गोवा, बेळगाव, हैदराबाद येथील ख्यातनाम लेखक, कवी, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते असे मिळून सुमारे ४०० ते ५०० प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे. सकाळी ८ वाजता केशवसुत कट्टा येथून महाविद्यालयीन मुलांसह दिंडीला प्रारंभ होणार आहे. १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी व ग्रंथस्टॉलचे उद्घाटन हरिहर आठलेकर, कविवर्य डॉ. वसंत सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर संमेलनाचे उद्घाटक डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) व अध्यक्ष सतीश काळसेकर यांच्या स्वागताध्यक्षपदी नगराध्यक्ष बबन साळगावकर आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ ते २ या वेळेत डॉ. नरेंद्र दाभोलकर विचारमंचावर ‘अण्णाभाऊ साठे’ यांच्या साहित्याची प्रस्तुतता व समकालीन साहित्याची दिशा यावर परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. माया पंडित (हैदराबाद), रणधीर शिंदे, नितीन रिंढे, आत्माराम लोमटे (जळगाव), डॉ. सुनील भिसे (वेंगुर्ले), प्रा. उदय रोटे (उल्हासनगर) सहभागी होणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत दुसरा परिसंवाद ‘सांस्कृतिक आक्रमकांची सद्दी वाढत चालली आहे का?’ होणार आहे. अध्यक्षस्थानी राजा शिरगुप्पे असून निमंत्रित सचिन परब (गोवा), मुक्ता दाभोळकर (दापोली), श्रीकांत देशमुख (नांदेड), गणेश विसपुते (पुणे), डॉ. शिवाजीराव जवळगेकर (लातूर) यांचा सहभाग आहे. सायंकाळी ५.३० ते ६.३० शाहिरी जलसा (सादरकर्ते शाहीर सदाशिव निकम, कोल्हापूर आणि शाहीर शितल साठे, मुंबई). ६.३० ते ८.३० या वेळेत निमत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. १८ जानेवारी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत डॉ. नरेंद्र दाभोलकर विचारमंचावर ‘राजकारण व समाजकारणाच्या कक्षा संकुचित होत चालल्या आहेत काय?’ हा परिसंवाद होणार आहे. संमेलनाचा समारोप १२.३० ते १.३० या वेळेत पालकमंत्री दीपक केसरकर, सतीश काळसेकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. राजन गवस, जयप्रकाश सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रात चांगल्याप्रकारे दिल्याबद्दल बी. बी. गायतोंडे, समाजकारण ज्ञानेश देऊलकर, राजकारण व समाजकारण जयानंद मठकर, साहित्यिकांमध्ये हरिहर आठलेकर, शिक्षण क्षेत्रात कल्याणी कांबळी यांचा जीवन गौरव सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच वाचक स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात येणारआहे. (वार्ताहर)