सावंतवाडी : निगुडे येथील तिलारी कालव्याच्या कामाची माहिती वेळेवर दिली जात नसल्याचे कारण देत महेश सावंत यांनी सोमवारी चराटा येथील तिलारी पाटबंधारे कार्यालयाच्या बाहेर उपोषण केले होते. हे उपोषण अश्वासनाअंती मागे घेण्यात आले आहे. तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे उपअभियंता प्रवीण मुदगल यांनी सदर माहिती तातडीने देऊ, असे आश्वासन दिले त्यानंतर सावंत यांनी उपोषण मागे घेतले आहे.निगुडे येथे कालवा विभागाचे काम सुरू आहे. यात चार ठेकेदार वेगवेगळी कामे करत असून, या कामांची माहिती महेश सावंत यांनी तिलारी पाटबंधारे विभागाकडे मागितली होती. पण माहिती देण्यात आली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही माहिती देण्यात आली नसल्याने अखेर महेश सावंत यांनी येथील चराटा पाटबंधारे कार्यालयाच्या बाहेर उपोषण केले.सावंत यांनी उपोषण करताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी मुदगल यांनी सावंत यांच्याशी संपर्क केला. तसेच त्यांनी मागितलेल्या माहितीबाबत विचारणा केली. त्यानंतर कार्यालयाकडून तातडीने माहिती देण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर सावंत यांनी आपले उपोषण मागे घेतले. तिलारी कालव्याच्या कामाबाबत सावंत यांनी वारंवार माहिती मागूनही ती देण्यात आली नव्हती त्यामुळे त्यांची नाराजी होती.
तिलारी पाटबंधारे कार्यालयाबाहेरील सावंत यांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 2:15 PM
निगुडे येथील तिलारी कालव्याच्या कामाची माहिती वेळेवर दिली जात नसल्याचे कारण देत महेश सावंत यांनी सोमवारी चराटा येथील तिलारी पाटबंधारे कार्यालयाच्या बाहेर उपोषण केले होते. हे उपोषण अश्वासनाअंती मागे घेण्यात आले आहे. तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे उपअभियंता प्रवीण मुदगल यांनी सदर माहिती तातडीने देऊ, असे आश्वासन दिले त्यानंतर सावंत यांनी उपोषण मागे घेतले आहे.
ठळक मुद्देतिलारी पाटबंधारे कार्यालयबाहेर सावंत यांचे उपोषणनिगुडेतील कामांबाबत नाराजी, आश्वासनाअंती उपोषण मागे