सावंतवाडी : सावंतवाडीत सोमवारी पाच दिवसांच्या गणपतीचे थाटात विसर्जन झाले. येथील मोती तलावात ढोलताशांच्या गजरात या घरगुती गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सावंतवाडीत सुमारे पाचशे ते सहाशे गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सावंतवाडीत सोमवारी पाच दिवसांच्या घरगुती गणपतीच्या विसर्जनाची लगबग सायंकाळपासूनच सुरू होती. पाच वाजल्यानंतर अनेकांनी आपले गणपती घराबाहेर काढण्यास सुरूवात केली. ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास भाविकांनी आपले गणपती मोती तलावात विसर्जित करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर अनेक ठिकाणी गणपतीच्या मोठ्या मिरवणुका सुरू होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. या गणपतीचे विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांच्या अहवालानुसार सावंतवाडी परिसरात पाच दिवसांचे पाचशे ते सहाशे गणपतींचे विर्सजन करण्यात आले आहे.यावेळी पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मोती तलावाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोती तलावाच्या सर्व बाजूंनी गणपतीचे विसर्जन करण्यात येते. पालिकेने खबरदारीचे उपाय म्हणून सर्व ठिकाणी स्वच्छता फलक तसेच निर्माल्य कलश ठेवले आहेत. तसेच पालिकेने भाविक जास्त खोल पाण्यात जाऊ नयेत म्हणून खास बोटीची ही व्यवस्था केली असून पालिका कर्मचारी याची देखभाल करीत आहेत. (प्रतिनिधी)आचरा समुद्रनिकाऱ्यावर गणरायाला निरोपमालवण तालुक्यातील आचरा समुद्रकिनाऱ्यावर गणेशभक्तांनी पाचव्या दिवशी गौरी गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप दिला. यावेळी आचरा किनारा भाविकांनी फुलला होता. फटाक्यांची आतषबाजी आणि पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोष करीत गणयाराला निरोप दिला.
सावंतवाडी दुमदुमली
By admin | Published: September 21, 2015 9:55 PM