सावंतवाडी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहानिमित्त कामगार कल्याण केंद्र, सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित गटस्तरीय महिला भजन स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र सावंतवाडी महिला भजन मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला. बांदेश्वर महिला भजन मंडळाने द्वितीय, तर कामगार कल्याण केंद्र मालवण संघाने तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक कामगार वसाहत पिंगुळी-कुडाळ व द्वितीय कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी संघाला देण्यात आला. वैयक्तिक पारितोषिक विजेते प्रथम तीन क्रमांकाप्रमाणे: उत्कृष्ट गायिका वर्षा देवण (सावंतवाडी), द्वितीय वरदा जोशी (बांदेश्वर महिला भजन मंडळ, वासंती धनवटकर (रत्नागिरी). हार्मोनियम वादक म्हणून लिना चितळे (खेर्डी वसाहत, चिपळूण), शर्मिला सागावकर (चिपळूण), हर्षदा राऊळ (गुहागर). सर्वाेत्कृष्ट तालसंचन-पिंगुळी वसाहत कुडाळ, कामगार कल्याण केंद्र, रत्नागिरी, खेर्डी वसाहत चिपळूण यांना मिळाला. पारितोषिक वितरण समारंभ सुप्रसिद्ध कीर्तनकार ललित तेली, बँक आॅफ इंडिया माडखोलच्या शाखा प्रबंधक नयना कामत, समता महिला मंडळाच्या अध्यक्षा माधुरी कोरगावकर, सामाजिक कार्यकर्त्या शारव्वा भुसाणावर, नाट्यदिग्दर्शक सचिन धोपेश्वरकर, कामगार कल्याण अधिकारी कुंदर खेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण शहाजहान शेख, श्रीपाद चोडणकर, मंजिरी धोपेश्वरकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नेवरेकर यांनी केले. सुस्मिता नाईक यांनी आभार मानले. (वार्ताहर)
सावंतवाडी महिला मंडळ जिल्हा भजन स्पर्धेत प्रथम
By admin | Published: October 11, 2015 8:54 PM