सावंतवाडी : शहरातील पर्यटनच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही उपोषण केले होते. याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीचे अध्यक्ष तहसीलदार होते. मात्र आता ते दबावाखाली दबलेले आहेत. या समितीला चौकशीमध्ये कामात झालेला भ्रष्टाचार कळून चुकला आहे. तहसीलदारांनी आपला अहवाल सादर केल्यास पांढऱ्या कपड्यातील भ्रष्टाचारी चेहरा नक्कीच समोर येईल असा टोलाही नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला. सावंतवाडी नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या पुंडलिक दळवी यांचाही खरपूस समाचार घेतला. शहरातील मोती तलावाकाठी बाजार बरोबर शहराचे विद्रुपीकरण केल्याचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी यांनी केला होता. यावरुनच परब यांनी दळवी यांचे राजकारणातील वय केवळ एक वर्ष आहे. त्यामुळे त्यांच्या या आरोपाला उत्तर देणे संयुक्तिक वाटत नसल्याचे सांगत कमळ हे चिखलातच उगवते फुटपाथ वर नाही असे प्रत्युत्तर दिले.या पत्रकार परिषदेत त्यांनी सावंतवाडीत उभारण्यात येणाऱ्या अद्यावत भाजी मंडईचा आराखडा तयार झाल्याचेही माहिती .यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, सत्यवान बांदेकर, बंटी पुरोहीत, अमित परब आदी उपस्थित होते.
..तर भ्रष्टाचारी चेहरा समोर येईल, नगराध्यक्ष संजू परब यांचा आमदार केसरकरांना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2021 6:31 PM