सावंतवाडी : सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानात हे चांदणे फुलांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त निसर्ग, चंद्र, चांदण्या या संकल्पनेवर आधारित एकापेक्षा एक सरस अशा हिंदी-मराठी गीतांच्या बहारदार नजराण्याने सावंतवाडीकर मंत्रमुग्ध झाले.सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी हे चांदणे फुलांनी या जुन्या-नव्या हिंदी व मराठी गीतांचा व चित्रपट गीतांचा बहारदार नजराणा व नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन सावंतवाडीत करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना सावंतवाडीचे नाव देशात पोहोचविण्यासाठी आणि शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करण्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हच्या सिटी आॅन सायकल या इव्हेंटमध्ये सहभागी व्हा असे आवाहन अन्नपूर्णा कोरगावकर यांनी केले.सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडीनेही सिटी आॅन सायकल या इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सावंतवाडीकरांना केले. सद्गुरू संगीत विद्यालयाच्या वर्षा देवन सिद्धी परब समृद्धी सावंत, मधुरा कांदोळकर, केतकी सावंत, अनामिका मेस्त्री, देवयानी केरकर, विधिता केंकरे, स्मिता केंकरे, पूजा दळवी, प्रांजला कळसुलकर, परी मिठबावकर, नितीन धामापूरकर, भास्कर मिस्त्री, सर्वेश राऊळ, चिन्मय साळगावकर, अंकुश आजगावकर, वैभव राणे, स्मिता गावडे, अनुष्का पेडणेकर, हर्षिता देवरुखकर, वैष्णवी गावडे, पावणी गावडे, आर्या बोलके, मुक्ता सापळे, सायली भेरे यांनी गीते सादर केली.या कार्यक्रमाला साथसंगत निलेश मिस्त्री, हार्मोनियम किशोर सावंत व नीरज भोसले, तबला भावेश राणे, ढोलकी अश्विन जाधव, मंगेश तळवणेकर, सूत्रसंचालन संजय कात्रे यांनी केले. तर ध्वनी संयोजन सुभाष शिरोडकर यांनी केले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, रसिका मिठबावकर, वसंत साळगावकर, सोमा सावंत, वैभव कोकरे, हेमंत खानोलकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. तर नरेंद्र मिठबावकर, शेखर पोकळे, दीपा सावंत, श्रीराम दीक्षित, गुरुदास देवस्थळी, विहंग देवस्थळी, अमेय तेंडुलकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. निलेश मिस्त्री यांच्या संकल्पनेतून शरद ऋतूच्या गारव्यात सादर होणाºया या कार्यक्रमाला सावंतवाडीतील रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.चंद्र, चांदणे संकल्पनेवर आधारित गीतेसद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडीनेही सिटी आॅन सायकल या इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सावंतवाडीकरांना केले. त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त निसर्ग, चंद्र व चांदणे या संकल्पनेवर आधारित जुन्या-नव्या हिंदी मराठी गीतांचा व चित्रपटगीतांचा बहारदार नजराणा नृत्याविष्कार सादर करण्यात आला.