शहरं
Join us  
Trending Stories
1
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
2
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
3
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
4
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
5
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
6
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
7
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
8
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
10
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
11
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
12
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
13
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
14
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
15
'मिट्टी में मिला देंगे...', 'योगी'राजमध्ये आतापर्यंत किती गुन्हेगारांचा एन्काउंटर? पाहा आकडेवारी
16
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
17
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
18
"लाडक्या बहिणींना मदत करताना जाहिरातबाजी आणि चमकोगिरीची गरज काय?", काँग्रेसचा सवाल
19
भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
20
"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 

लोकसभा की विधानसभा?, मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

By अनंत खं.जाधव | Published: November 11, 2023 4:32 PM

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले ते खरे नाही आम्ही काही ग्रामपंचायत ...

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले ते खरे नाही आम्ही काही ग्रामपंचायत या युतीमधून लढवल्या होत्या. त्यामुळे एकही ग्रामपंचायत नाही म्हणणे चुकीचे आहे. मी आमदारकी सोडून खासदारकी लढविणार असा ही प्रचार झाला, पण काहीच्या मनातील हा गोड गैरसमज दूर होण्यासाठीच मी २०२४ ची विधानसभाच लढविणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. ते आज, शनिवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मतदार संघातील बरीच विकास कामे पूर्ण झाल्याचा दावाही ही केला.मंत्री केसरकर म्हणाले, राज्याच्या शिक्षणविभागात केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरण समोर बदल होत आहेत. त्यामुळे शिक्षणामध्ये महाराष्ट्र राज्य पुढच्या वर्षी एक नंबरवर असणार आहे. राज्य सरकारकडून लाखांहून अधिक जास्त सरकारी नोकर भरती करण्यात आली. तर राज्यात 61 हजार शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणल्याचे त्यांनी सांगितले.मराठा बांधवांनी आंदोलन करण्यापेक्षा..मराठा समाज बांधवांना टीकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाशी चर्चा करूनच काही निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. मराठा समाज बांधवाना आरक्षण देताना ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणारे असावे असेही त्यांनी सांगितले. मराठा बांधवांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारला डाटा मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.खासदारकीच्या उमेदवाराला 50 हजाराचे लीड मिळून देणार सावंतवाडी मतदारसंघांमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले. मात्र आम्ही गाव पॅनल म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो तर खानोली व मातोंड या दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढवण्यात आली. त्यामुळे काही ग्रामपंचायत नाही असा प्रचार करणे चुकीचे आहे. दुसरीकडे मी आमदारकी नाही तर खासदारकी लढवणार असा प्रचारही काही कडून करण्यात येत आहे. मात्र काहींच्या मनातील हा गैरसमज दूर करण्यासाठी मी 2024 मध्ये आमदारकीच लढवणार असल्याचे स्पष्ट केले. शिवाय पक्षाकडून खासदारकीसाठी या मतदारसंघातून जो कोणी उमेदवार असेल त्याला 50 हजारचे लीड मिळून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्या निवृत्त शिक्षकांना मानधन मिळणार..विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये म्हणून राज्यातील शाळांमध्ये नेमण्यात आलेल्या निवृत्त शिक्षकांना अद्यापही मानधन मिळाले नसल्याबाबत मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिले असता निवृत्त शिक्षकांना तात्काळ मानधन देण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर