शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मालवणातील स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक आक्रमक

By admin | Published: October 26, 2015 11:32 PM

मासेमारीनंतर आता पर्यटन व्यावसायिकात ‘द्वंद्व’

मालवण : मालवण किनारपट्टी गेले काही दिवस मच्छिमारातील संघर्षाने ढवळून निघाली असतानाच मालवण किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकात ‘जलक्रीडा’ पर्यटनावरून देवबाग विरुद्ध मालवणातील व्यावसायिक असे द्वंद्व सुरु झाले आहे. देवबाग येथे एक खिडकी पद्धतीत सहभागी न होता वॉटरस्पोर्ट्स बरोबरच स्वतंत्र स्कुबा डायव्हिंग व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाविरोधात मालवण बंदर जेटी येथील स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक आक्रमक बनले आहेत. तहसिलदार, बंदर निरीक्षक यांनी समजावूनही तो पर्यटन व्यावसायिक आपले आडमुठे धोरण सोडत नसल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. आम्हीही मालवण किनारपट्टीवर देवबाग धर्तीवर वाटरस्पोर्ट्स, बोटिंग, परासिलिंग आदी प्रकार सुरु करू, असा मालवणातील व्यावसायिकांनी इशारा दिला आहे. मालवण किनारपट्टीवरील समुद्रातील स्कुबा डायव्हिंग पर्यटन प्रकाराला देशी-विदेशी पर्यटकांची मोठी पसंती आहे. गेल्या काही वर्षात उदयास आलेल्या या व्यवसायात किनारपट्टीवरील मच्छीमार व युवक सहभागी झाले आहेत. सुरुवातीला स्वतंत्र व्यवसाय करताना कमी-अधिक दरावरून वादाचे प्रकार घडले. याचा पर्यटनावर परिणाम होऊ नये. पर्यटकांच्या सुरक्षेची अधिक काळजी घेवून मालवणातील व्यावसायिक संस्थेच्या छताखाली एकत्र आले. संस्थेकडून या पर्यटन प्रकारच्या परवानगीसाठी परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर केला. मंगळवार २७ आॅक्टोबरला या सर्वांची पाहणी करून लवकरच परवाने मिळणार आहेत. असे असताना देवबाग येथील एका व्यावसायिकाकडून स्कुबा डायव्हिंग सुरु करण्यात आले आहे. त्याच्या दरातही तफावत असून त्याचा इतरांवर परिणाम होत असल्याचे मालवणातील पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे.या प्रकारानंतर सिंधुदुर्ग जलक्रीडा सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रुपेश प्रभू, सचिन गोवेकर, दामोदर तोडणकर आदी व्यावसायिकांची बैठक पार पडली. यावेळी जर हा व्यावसायिक मनमानी पद्धतीने व्यवसाय करीत असेल तर देवबागच्या धर्तीवर मालवण किनारपट्टीवर जलक्रीडा प्रकार कमी दरात पर्यटकांना उपलब्ध करून देवू असा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)समान दर ठेवण्यास तयार पर्यटकांच्या अधिक सुरक्षेसाठी संस्थेच्यावतीने सिलिंडरसह स्कुबा डायव्हिंग केले जात आहे. मात्र याचा वापर ‘त्या’ व्यावसायिकाकडून होत नाही. याबाबत चार दिवसांपूर्वी तहसीलदार वनिता पाटील यांच्यासमोर बैठक झाली. त्यावेळी त्या व्यावसायिकाने आपला व्यवसाय स्वतंत्र आहे. मालवणात येवून व्यवसाय करणे मला व माझ्या सहकाऱ्यांना शक्य नाही. इतरांप्रमाणे एकच दर ठेवून परवाना प्रक्रिया पूर्ण करून व्यवसाय करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्याच धर्तीवर आज मालवण बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांच्यासमोर झालेल्या बैठकीत याच चर्चेचा सूर आळवला गेला आहे.