शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
3
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
4
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
5
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
6
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
7
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
8
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
9
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
10
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
11
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
12
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
13
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
14
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
15
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
16
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
17
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
18
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
19
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
20
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

हागणदारीमुक्तीवर शिक्कामोर्तब

By admin | Published: August 03, 2016 12:38 AM

कामकाजावरही समाधान : सावंतवाडीची राज्य समितीकडून पाहणी

 सावंतवाडी : स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत हागणदारीमुक्त घोषित झालेल्या सावंतवाडी शहराची समितीच्या अधिकारी व सदस्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेला भेट देऊन पाहणी केली. हागणदारीमुक्ती घोषित झालेल्या शहरावर या समितीच्या पाहणीअंती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला. स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत सावंतवाडी शहर एक महिन्यापूर्वीच हागणदारीमुक्त घोषित केले होते. त्याच पार्श्वभूमीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची समिती मंगळवारी पहाटेच सावंतवाडी शहरात दाखल झाली. यामध्ये धुळे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय कदम, औरंगाबादचे प्रादेशिक उपायुक्त अलका खैरे, वरिष्ठ पत्रकार दत्ता सांगळे, समर्थ असोसिएशन पुणेचे दीपक बाचुलकर यांचा समावेश होता. या समितीला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जिमखाना मैदान, उपरलकर स्मशानभूमी नजीकचा परिसर, कचरा डेपो, शहरातील वॉर्डमधील नाले परिसरासह संपूर्ण शहराची पाहणी करविली. तसेच नगरपरिषदेच्या कामकाजाची माहिती दिली. पाहणीअंती परिषदेच्या कामकाजावर समाधान व्यक्त करीत सावंतवाडी शहराला हागणदारीमुक्त शहर असा शिक्कामोर्तब केला. दुपारी पाळणेकोंड धरणाची पाहणीही केली. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, नगरसेवक विलास जाधव, संजय पेडणेकर, देवा टेंबकर, गोविंद वाडकर, नगरसेविका कीर्ती बोंद्रे, अफरोज राजगुरु, शर्वरी धारगळकर, शुभांगी सुकी, क्षिप्रा सावंत, साक्षी कुडतरकर, वैशाली पटेकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर) तोंडभरून कौतुक ४सावंतवाडी नगरपरिषदेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती राज्य समितीने घेतली. तसेच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांचे कौतुक केले. सावंतवाडी शहर आणि स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी घेतलेल्या मेहनतीचे समिती सदस्यांनी तोंडभरून कौतुक केले.