शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

सुरक्षा चौकीदार मजुराच्या हाती

By admin | Published: April 07, 2015 10:49 PM

तिलारी प्रकल्प : आठ महिने धरण अंधारात, तीन महिन्यांपासून रक्षकच नाही--लोकमत विशेष

अनंत जाधव - सावंतवाडी -देशातील प्रमुख धरण प्रकल्पाच्या सुरक्षेचे आॅडिट होत असतानाच गोवा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या तिलारी आंतरराज्य प्रकल्पाची सुरक्षा बेभरवशाची बनली आहे. ना धरणावर वीज, ना सुरक्षारक्षक अशी अवस्था आहे. आॅगस्ट २०१४ पासून धरणावरचा वीज पुरवठा खंडित आहे. तसेच निधीअभावी वीजबिल भरण्यात आले नाही. तीन महिन्यांपूर्वी धरणावरचे वीस सुरक्षारक्षकही कमी केल्याने धरणाची सुरक्षा कार्यालयातील चौकीदार व मजूर करत आहेत.२६/११ ला मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर अतिरेक्याचे पुढील टार्गेट हे महाराष्ट्रातील मोठे पाटबंधारे प्रकल्प असल्याचे गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालात अनेक वेळा स्पष्ट केले आहे. त्यासाठी शासनाने राज्यातील मोठ्या प्रकल्पांना विशेष सुरक्षा पुरवण्याचे ठरवले होते. महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर असलेला तिलारी आंतरराज्य प्रकल्पही मोठा आहे. आतापर्यंत गोवा तसेच महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या विविध निधीतून या धरणावर १ हजार कोटी रूपये खर्च केले आहेत. १६ टीएमसीचा हा प्रकल्प आहे. १६ किलोमीटर या धरणाचे क्षेत्र असून या धरणाची साधारणत: रूंदी १ किलोमीटरच्या जवळपास आहे. या प्रकल्पातून गोव्याला ७८ टक्के पाणी पुरवठा होत असून महाराष्ट्राला २२ टक्के पाणी मिळत आहे. या धरणावर सर्वाधिक खर्च गोवा सरकारने केला आहे. मात्र, सध्या प्रकल्पाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. तिलारी प्रकल्पाला गेले वर्षभर निधी नाही. त्यातच अंतर्गत खर्च मिळेनासा झाल्याने तिलारी प्रकल्पाला विद्युत पुरवठा करणारे दोन विद्युत जनित्र खराब होऊन आठ महिने उलटली तरी ती बदलण्यात आली नाहीत. ही जनित्रे बदलण्यात न आल्याने तिलारी धरणावरचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच विजेचे बिल भरण्यात आलेले नाही. साधारणत: नवीन जनित्रे बसवण्यासाठी ११ लाखाचा खर्च अपेक्षित असून कोनाळकट्टा येथील कार्यालयाने हा प्रस्ताव सप्टेंबर २०१४ मध्ये शासनाकडे पाठवून दिला आहे.मात्र, याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने ही जनित्रे बसविण्यात आली नाहीत. त्यामुळे पूर्ण तिलारी धरण अंधारात आहे. तिलारी धरणाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा प्रकार ताजा असतानाच शासनाने धरणावर असलेले २० सुरक्षारक्षक कमी केले आहेत. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांचे काम तिलारी येथे कार्यरत असलेले चौकीदार व मजूर करीत आहेत. या चौकीदार व मजुरांकडे कार्यालयीन कामकाजाबरोबरच धरणाच्या सुरक्षेचे काम दिले आहे. आघाडी सरकार गेले आणि युती सरकार आले. मात्र, पाटबंधारे प्रकल्पाच्या चौकशीचा ससेमीरा काही संपत नसल्यानेच कोकणातील अनेक प्रकल्पांना निधी मिळणे दुरापास्त बनले आहे.प्रस्ताव पाठविलातिलारी प्रकल्पावरील विद्युत जनित्रे खराब झाली आहेत. त्यामुळे धरणावरचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्याला ११ लाखांचा निधी अपेक्षित असल्याचे शासनाला पत्राने कळविण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत आम्हाला निधी प्राप्त झाला नाही. तर शासनानेच धोरणाप्रमाणे सुरक्षा रक्षक कमी केले आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचारीच धरणाची देखभाल करीत आहेत.- आर.बी.कुरणे, कार्यकारी अभियंता तिलारी पाटबंधारेकामे थांबविलीगेले वर्षभर तिलारी प्रकल्पाला निधी आला नाही. त्यामुळे अनेक ठेकेदारांनी आपली कामे थांबवली आहेत. अधिकारी ठेकेदारांना मुदतवाढ देत आहेत. लोकप्रतिनिधींनी कोकणातील पाटबंधारे प्रकल्पाकडे पाठ फिरवल्याने आता पूर्ण होऊ घातलेले प्रकल्पही आता मागे पडत चालले आहेत. तिलारी प्रकल्प हा गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील मोठा प्रकल्प आहे. असे असताना त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे.