शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

कजोल गुरवची राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंगसाठी निवड

By admin | Published: December 23, 2014 9:59 PM

राजापूरचा सन्मान : महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच सुवर्ण कामगिरी

राजापूर : मुंबई विद्यापीठअंतर्गत मुुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धा मुुंबई (मालाड) येथे पार पडल्या. या स्पर्धेत राजापूरची गोल्डन गर्ल कजोल हिने आबासाहेब मराठे विद्यालयाचे प्रतिनिधीत्व करत ५२ किलो वजनी गटात एकूण २९२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. महाविद्यालयाच्या इतिहासात पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे.त्यानंतर लगेचच वेंगुर्ला येथे ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत कजोलने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत ५२ किलो वजनी गटात २९० किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. अवघ्या २.५ किलो वजनाच्या फरकाने कजोलचे सुवर्णपदक हुकले.या कामगिरीमुळे तिची १ ते ३ जानेवारी दरम्यान पंजाब येथे होणाऱ्या आॅल इंडिया युनिर्व्हसिटी स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. तसेच ५ ते १० जानेवारी दरम्यान जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.मुंबई विद्यापीठाच्या संघातून आॅल इंडिया स्पर्धेसाठी कजोल पहिल्यांदाच आपले कसब पणाला लावणार आहे. ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत गतवर्षी हिमाचल प्रदेशमध्ये तिने चौथा क्रमांक पटकावला होता. त्यामुळे यावर्षी कजोलकडून राजापूरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यावर्षी मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा मानस आहे, असे कजोलने सांगितले.कजोल सध्या एसवायबीएला आबासाहेब मराठे विद्यालयात शिकत आहेत. पॉवरलिफ्टिंगमध्ये आशियाई सुवर्णपदक विजेता खेळाडू प्रतीक गुरव याच्या मार्गदर्शनाखाली पॉवरलिफ्टिंग कसून सराव करीत आहे. वर्षभर केलेल्या प्रचंड मेहनतीचे फळ मिळत आहे आणि राष्ट्रीय स्पर्धेत कजोलकडून मोठी आशा आहे, असे प्रशिक्षक प्रतिक यांनी सांगितले.राजापूर या तालुक्याच्या ठिकाणासारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडत आहेत. ही राजापूरकरांसाठी अभिमानाची बाब असल्यामुळे कजोलच्या या दुहेरी यशाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे. या यशाबद्दल वडील अशोक गुरव, आई अस्मिता गुरव, काका संजय गुरव, संपूर्ण कुटुंबीय, महाविद्यालयाचे प्राचार्य तपासे, क्रीडाशिक्षक भंडारी, शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच शिवशक्ती क्रीडा मंडळातर्फे तिचे जोरदार अभिनंदन करण्यात आले. तिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी कजोल २४ डिसेंबर रोजी रवाना होणार आहे. या निवडीबद्दल जिल्हाभरातून तिचे विशेष अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)