शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
4
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
5
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
6
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
7
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
10
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
11
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
12
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
14
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
15
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
16
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
17
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
19
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
20
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार

Maharashtra Assembly Election 2019 : शेतकऱ्यांच्या नेतृत्वासाठी विधानसभेत पाठवा : सतीश सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:05 PM

शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा. शेतकरी समृद्ध करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नेतृत्वासाठी विधानसभेत पाठवा : सतीश सावंत देवगड तालुक्यात गावभेट दौरा, फणसगांव येथे ग्रामस्थांशी संवाद

देवगड : मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांसह गोरगरिबांची मला जाण आहे. मीही गरिबी अनुभवली आहे. मी स्वत: शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मला माहीत आहे. शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा. शेतकरी समृद्ध करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी केले.

देवगड तालुक्यातील फणसगांव येथे प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर आदी उपस्थित होते.मी ३५ वर्षे राजकीय क्षेत्रात आहे. मी उपभोगलेल्या पदांना नेहमी न्याय दिला आहे. शेतकºयांसह गोरगरिबांसाठी या पदांचा उपयोग केला. पदे घेऊन माझे उत्पन्न वाढविले नाही. जनतेच्या हितासाठी कामे केली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा अध्यक्ष झाल्यापासून शेतकरी व सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविल्या आहेत.

या केलेल्या कामाची जनतेकडे पोचपावती मागत आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांनीही आमच्यावर विनाकारण टीका न करता आपण केलेल्या कामाची पोचपावती मागावी. जनता त्याचे उत्तर देईल. असे सावंत यांनी पोंभुर्ले येथे बोलताना सांगितले.यावेळी उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर, माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, विठ्ठलवाडी सरपंच दिनेश नारकर, उंडील सरपंच जयेश नर, पोंभुर्ले सरपंच सादीक डोंगरकर, माजी सरपंच गणपत धुरी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अशोक पाडावे, गोविंद घाडी उपस्थित होते.विद्यमान आमदार जनतेची कामे करण्यात अपयशी ठरले आहेत. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले हे विचारण्याची गरज आहे. केवळ राडेबाजी व दहशत माजवून साºयांना त्रास दिला.

अधिकाऱ्यांवरील चिखलफेक प्रकरणामुळे राज्यात जिल्ह्याची मान शरमेने खाली गेली आहे. ही संस्कृती साऱ्यासाठी घातक आहे, असे त्यांनी कोर्ले येथे सांगितले. यावेळी माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, विठ्ठलवाडी सरपंच दिनेश नारकर, उंडील सरपंच जयेश नर आदी उपस्थित होते.नीतेश राणेंनी नाणारबाबत भूमिका स्पष्ट करावीनाणारमुळे शेतकऱ्यांसह मच्छिमार उद्ध्वस्त होणार आहेत. कोकणाला हानिकारक ठरणारा प्रदूषणकारी प्रकल्प आम्हांला नको आहे. आमचा या प्रकल्पाला विरोध आहे. आमची विरोधाची भूमिका आम्ही कायम ठेवली आहे.आम्ही रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. सहा महिन्यांपूर्वी विरोधाची भाषा करणाऱ्या नीतेश राणे यांनी आपली याबाबतची भूमिका आता जाहीर करावी, असे सतीश सावंत यांनी धालवली येथे सांगितले.

टॅग्स :kankavli-acकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गSatish Sawantसतीश सावंत