सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातार्डा येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते विजय कुडतरकर (78 )यांचे बुधवारी निधन झाले गेले दोन दिवस ते आजारी होते त्यातच. अचानक त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागल्याने गोवा बांबोळी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण तेथेच त्याचे उपचारादरम्यान निधन झाले. विजय कुडतरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काॅग्रेस चे चालते बोलते विद्यापीठ म्हणून ओळखले जायचे महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी त्याचे एकदम जवळचे संबंध होते.तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांना थेट फोन करून जनतेची कामे करण्याची कसब त्याच्यात होती आणि वेळोवेळी हे त्यांनी दाखवून दिले होते.राज्याचे माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती.
सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम सुरू केले होते माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांचे ते जवळचे कार्यकर्ते होते त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस च्या वाढीला वाहून घेतले होते.माजी मंत्री भाईसाहेब सावंत हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी रस्त्याच्या कामासाठी भाईसाहेब सावंत यांना पटकळणीच्या फुलाचे हार घालून प्रतिकात्मक आंदोलन केले त्यांची सामाजिक कामाची तळमळ पाहून भाईसाहेब सावंत यांनी त्यांना आपल्या सोबत घेतले.
विजय कुडतरकर यांची एक आंदोलनातील कार्यकर्ते म्हणून ओळख होती.ते सतत काॅग्रेस पक्ष वाढला पाहिजे यासाठी सतत धडपडत असत सातार्डा येथे जरी राहात असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस च्या प्रत्येक कार्यक्रमात ते सहभागी होत असत त्याच्या अचानक झालेल्या निधनाने काँग्रेस पक्षावर शोककळा पसरली असून धडाडीचा कार्यकर्ता आपल्या तून निघून गेल्याची भावना काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.कुडतरकर याच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.कुडतरकर याच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्याच्या निवासस्थानी धाव घेत कुटुंबिषयांचे सांत्वन केले.