सिंधुदुर्ग : आॅल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट असोसिएशन शाखा सिंधुदुर्ग, मालवण विभागाच्यावतीने मालवणातील पेन्शनरांची सभा भरड येथील हॉटेल लीलांजली सभागृहात जिल्हाध्यक्ष एस. ए. डिसोजा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सातवा वेतन आयोग व त्याची अंमलबजावणी व शासनाचे नवीन आदेश याबाबत सचिव एम. डी. जोशी यांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले. तर यावेळी बी. डी. परब व आनंदीबाई राणे या ८० वर्षांवरील पेन्शनरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बी. जी. घाडी यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी एम. डी. जोशी यांनी दूरसंचारच्या पेन्शनर्सना मिळणारी पेन्शन तसेच मेडिकल अलाऊन्स सुधारणेबाबतची सद्यस्थिती आणि पेमेट्रिक्सने होणारी पेन्शन निश्चितीबाबत भूमिका स्पष्ट केली. यावेळी पी. के. बागवे व वाय. के. टिळक यांनीही विचार मांडले. यावेळी बहुसंख्य पेन्शनर्स उपस्थित होते.शासनाच्या नवीन आदेशाची माहिती देताना जोशी यांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या मुलांना मिळणारी फॅमिली पेन्शन विवाहानंतर पण चालू ठेवावी, पेन्शनर मिलिटरी व सिव्हील अशा दोन पेन्शन घेत असेल तर त्यांच्या पश्चात कुटुंबाला सुद्धा दोन पेन्शन द्याव्यात, १ जानेवारी २००६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनरांना ६ व्या आयोगाने कर्मचाºयांसाठी निर्माण केलेल्या ग्रेड पे चा फायदा मिळालेला नव्हता, जानेवारी २०१६ पासून ग्रेड पे चा फायदा देऊन पेमेट्रिक्स फॉर्म्युल्यानुसार जानेवारी २००६ पूर्वीच्या सर्व पेन्शनरांना सुधारित पेन्शन देण्याचा आदेश निर्गमित केला असून बºयाच पेन्शनरांच्या पेन्शनमध्ये वाढ होईल, अशी माहिती दिली.
सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी व्हावी! मालवणात केंद्र सरकारी पेन्शनर्सचा मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 2:58 PM